देशभरातील आतापर्यंतचा एकूण पाऊस
* या पावसाळी हंगामात 1 जूनपासून 31ऑगस्ट अखेर संपूर्ण भारतात सामान्य सरासरीच्या 106% पाऊस झाला आहे. बिहार आणि ईशान्य प्रदेशातील काही भाग वगळता बहुतेक राज्यांमध्ये असलेली तूट त्यामुळे भरून निघाली. आयएमडीकडून जारी विभागनिहाय पावसाची स्थिती …
राज्यातील 31 ऑगस्ट अखेर एकत्रित पाऊस (जिल्हानिहाय)
💙 सरासरीपेक्षा 60% हून जास्त पाऊस
🩵 20% ते 59% जास्त पाऊस
💚 सामान्य पाऊस (-19% ते +19%)
❤️ -20% ते -59% तूट
💛 सरासरीपेक्षा 60% हून जास्त तूट
ऑगस्ट मधील मुसळधार पाऊस मराठवाड्यासाठी बोनस ठरला. लातूर, नांदेड, धाराशिव, बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्तीचा पाऊस पडला. सातारा, नंदुरबार आणि उत्तर विदर्भ वगळता राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त होता. एकूणच या पावसाळ्यात 1 जून ते 31 ऑगस्ट अखेर महाराष्ट्रात आतापर्यंत चांगला पाऊस पडला आहे.