मुंबई : विदर्भ – मराठवाड्यातील भागात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज-उद्या पुन्हा पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच “आयएमडी”नं अलर्ट दिला आहे.
ॲग्रोवर्ल्डतर्फे अस्सल व नैसर्गिकरित्या पिकविलेला देवगड हापूस… आरोग्याशी खेळ नाही..
सध्या देशाच्या दक्षिण-पूर्वेकडून उष्णकटिबंधीय वारे वाहत असून ओडिशावर चक्रीवादळ निर्माण होत आहे. याशिवाय, दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेशात कमी पातळीचं परिसंचरण आहे. दुसरीकडे, गुजरातमध्येही एक कुंड तयार झालं आहे. त्यात इराणवर असलेलं एक वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू-काश्मीरकडे सरकत असल्यानं तिथं ढग जमा होत आहेत. परिणामी, आज आणि उद्या म्हणजेच 13 व 14 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच “आयएमडी”नं तसा अलर्ट दिला आहे.
विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात गारपीट होऊ शकते. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामान व थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि मध्य प्रदेशातही पावसाचा तडाखा बसेल.
ॲग्रोवर्ल्ड बुलेटिन 12 एप्रिल। मका-सोयाबीनच्या 81 GM बियाण्यांना चीनकडून मान्यता