जळगाव : Rabi Crop… जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून थंडी वाढली असून यामुळे रब्बीतील पिकांच्या वाढीसह त्यावर होणाारा रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून वातारवणात झालेल्या बदलाचा परिणाम ऋतूमानावरही झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे पेरणीसह सर्व शेतीची कामे उशिराने उरकावी लागली. कसे तरी खरीप पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर रब्बीत शेतकर्यांना दिलासा मिळेल, अशी आस शेतकर्यांना असतांना थंडीलाच उशिराने सुरूवात झाल्याने शेतकर्यांचा हिरमोड झाला होता.
दीड महिन्यानंतर थंडीचे आगमन
यंदा थंडीचेही आगमन तब्बल दीड महिना उशिराने झाले. थंडी जाणवत नसल्यामुळे गहू, हरभरा, भुईमूग उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले होते. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. वाढलेल्या थंडीमुळे पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केली जात असून रब्बी हंगामातील उभ्या पिकांच्या वाढीची चिंता दूर झाली आहे.
पेरण्या उशिराने
पावसाला उशिराने सुरुवात झाल्याने खरीपाची पेरणी उशिराने झाली. त्याचा परिणाम म्हणून काढणीही उशिराने झाले. त्यातच थंडीला उशिरा सुरुवात झाल्याने जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा, भुईमूंग या रब्बीच्या पिकांची पेरणीही उशिराने केली जात असल्याचे समजते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇