मुंबई : नाशिक बाजार समितीत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन कांदा दाखल झालेला आहे. सध्या विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला दर मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील पिपंळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला दर मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीत कांद्याला किती दर मिळाला आहे.
यावर्षी ला निनोच्या प्रभावामुळे देशभरात चांगला पाऊस झाला आहे. सध्या परतीचा पाऊस राज्यातील अनेक भागात धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. मात्र, या पावसामुळे काही भागातील शेती पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली असून विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला 4 हजार ते 4 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा दर सुरु आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रतिक्विंटल 4 हजार 926 रुपये दर मिळाला असून 4500 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 4 हजार 380 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून सर्वसाधारण दर हा 4 हजार रुपये दर मिळाला. छ. संभाजीनगर बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त दर हा 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. इतरही बाजार समित्यांमधील बाजारभाव खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ, पुणे
बाजार समिती |
परिमाण |
आवक |
सर्वसाधारण दर |
छत्रपती संभाजीनगर | क्विंटल | 972 | 3000 |
मुंबई – कांदा बटाटा मार्केट | क्विंटल | 8009 | 3250 |
खेड-चाकण | क्विंटल | 450 | 3250 |
लासलगाव | क्विंटल | 84 | 3000 |
पुणे | क्विंटल | 13130 | 3300 |
पुणे -पिंपरी | क्विंटल | 18 | 3700 |
पुणे-मोशी | क्विंटल | 468 | 2250 |
कल्याण | क्विंटल | 3 | 4250 |
येवला | क्विंटल | 3000 | 3700 |
लासलगाव | क्विंटल | 2676 | 4000 |
लासलगाव – विंचूर | क्विंटल | 750 | 4050 |
मालेगाव-मुंगसे | क्विंटल | 2800 | 3950 |
मनमाड | क्विंटल | 250 | 3600 |
पिंपळगाव बसवंत | क्विंटल | 4500 | 4200 |
दिंडोरी-वणी | क्विंटल | 1009 | 4211 |
देवळा | क्विंटल | 3730 | 4250 |