सध्या रब्बी हंगामाची अनेक शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. रब्बी हरभरा बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया आपण जाणून घेऊ. हरभर्याच्या विविध वाणांचे दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे लागते, म्हणजे एकरी रोपांची संख्या अपेक्षित मिळते.
विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत, फुले विश्वराज या मध्यम दाण्यांच्या वाणाकरीता 26 ते 28 किलो; तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोर्या दाण्यांच्या वाणाकरिता 40 किलो प्रति एकर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. कृपा आणि पीकेव्ही 4 या जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरीता 50 ते 52 किलो प्रति एकर बियाणे वापरावे.
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा व्हीरीडी 5 ग्रॅम किंवा थायरम 2 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम चोळावे. यानंतर 250 ग्रॅम रायझोबिअम प्रति दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणात मिसळून चोळावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभऱ्याच्या मुळांवरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे 3 ते 5 टक्के उत्पादन वाढते.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- कृषी सल्ला : कापूस पाते व बोंड गळ कशी रोखावी
- कृषी सल्ला : मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखावा