मुंबई : PMEGP योजना म्हणजेच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजना केंद्र सरकारने जारी केली आहे. या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. देशातील सर्व तरुणांना त्यांचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना स्वयंरोजगारासाठी 10 ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा मिळते. यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य, अनुदान किती, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, लाभ, अर्ज कुठे करायचा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊ या…
आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने पीएमईजीपी योजना सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना PMEGP लोन योजनेचा लाभ घेता येणार आहे. पीएमईजीपी योजना 2022 अंतर्गत अधिकाधिक बेरोजगार तरुणांना कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करून देणे याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे.
मधाचा गोडवा अन् रोजगाराचीही संधी ; असा घ्या मधकेंद्र योजनेचा लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/TgyUpPxd5Ao
PMEGP योजनेचे फायदे
देशातील बेरोजगार तरुणांना या योजनेंतर्गत स्वतःचा उद्योग, रोजगार सुरू करण्यासाठी 10 ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना त्यांची जात व ग्रामीण, शहरी क्षेत्रानुसार अनुदान दिले जाते. शहरी भागातील पीएमईजीपीसाठी नोडल एजन्सी जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) आहे, तर ग्रामीण भागात खादी व ग्रामोद्योग मंडळाला (केव्हीसी) संपर्क साधता येईल. लोन अशाच बेरोजगार तरुणांना देण्यात येईल, ज्यांना स्वत: चा रोजगार सुरू करायचा आहे.
पीएमईजीपी योजना 2022 ची पात्रता
अर्जदाराचे किमान ८वी पास असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. जर अर्जदारास आधीपासूनच अन्य अनुदान योजनेचा लाभ मिळत असेल, तर अशा परिस्थितीतही तो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही. या योजनेअंतर्गत हे कर्ज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील देण्यात येईल, हे कर्ज जुन्या व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी दिले जात नाही. कोणत्याही सरकारी संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीस या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल. सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्थांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पीएमईजीपी योजना अनुदान रक्कम
सर्वसाधारण प्रवर्गासाठी – शहरी क्षेत्रासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या १५%, ग्रामीण क्षेत्रासाठी खर्चाच्या २५%, तर एकूण प्रकल्प खर्चाच्या १०% किंमती स्वतःचे योगदान असणार आहे.
SC, ST, OBC, अल्पसंख्याक, महिला, शारीरिक अपंग, भूतपूर्व सैनिक, इ. – शहरी क्षेत्रासाठी एकूण प्रकल्पांच्या २५% खर्च, ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५%, एकूण प्रकल्प खर्चाच्या ५% स्वतःचे योगदान असणार आहे.
कोणत्या प्रकारचे उद्योग स्थापित केले जाऊ शकतात?
कृषी आधारित
वन आधारित उद्योग
अपारंपरिक ऊर्जा
रासायनिक आधारित उद्योग
खाद्य क्षेत्र
अभियांत्रिकी
खनिज आधारित उद्योग
वस्त्रोद्योग (खादी वगळता)
सेवा उद्योग
लाभ कोण घेऊ शकतात ?
अनुसूचित जाती (SC )
माजी सैनिक
अनुसूचित जमाती (ST )
दिव्यांग
महिला
इतर मागासवर्ग (OBC )
पूर्वोत्तर राज्यातील लोक
अल्पसंख्याक
सीमावर्ती भागात आणि डोंगरावर राहणारे लोक
पीएमईजीपी कर्ज योजना 2022 साठी कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
पॅन कार्ड
जात प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
PMEGP लोन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कुठे करावा ?
PMEGP लोन साठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/pmegphome/index.jsp ला भेट द्या.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Good News : आता राज्यात सीएम किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6,000 रुपये अनुदान
- Food Processing… प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME) ; ‘इतके’ मिळेल अनुदान
Comments 4