मुंबई : PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. PM किसान सन्मान निधी योजना ही त्यापैकीच एक आहे.
या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये डीबीटीद्वारे वर्ग केले जात आहेत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये ट्रान्सफर मिळाले असून प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधव 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
या आठवड्यात मिळू शकतील पैसे
PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. दरम्यान, ही रक्कम DBT च्या माध्यमातून शेतकर्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आतापर्यंत 12 हप्ते ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9 वा हप्ता पाठवण्यात आला होता. ज्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच 2,000 रुपये पाठवून भारत सरकार शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट देऊ शकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
जमिनीच्या नोंदी तपासा
जमिनीच्या नोंदीची पडताळणी केली नाही तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळेच तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन हे काम पूर्ण करून घ्या.
बनावट शेतकरी योजनेतून बाहेर
या योजनेत ज्या लोकांनी आतापर्यंत फसव्या पद्धतीने लाभ घेतला आहे. या लोकांची नावे त्या-त्या राज्यांनी जाहीर केली आहेत. आता त्या लोकांकडून पैसे परत घेतले जात आहेत. यावेळी त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. तसेच मागील हप्त्याचे पैसे त्यांना सरकारला परत करावे लागणार आहेत. या योजनेचा फसव्या मार्गाने लाभ घेणारे अनेकजण होते. याला आळा घालण्यासाठी शासनाने जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे.
ई-केवायसी करा, अन्यथा
सरकार कडून आता जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीला वेगाने सुरुवात केली गेली असून त्यामध्ये दररोज अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. ज्यामुळे असे मानले जाते आहे की, 12 व्या हप्त्याप्रमाणेच पुढील 13 व्या हप्त्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या संख्येत घट होऊ शकेल. 12 व्या हप्त्यादरम्यान, राज्यांमधील अनेक लाभार्थ्यांची नावे या योजनेच्या लिस्टमधून वगळण्यात आली होती. जर आपणही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर ते शक्य तितक्या लवकर करून घ्या. अन्यथा आपलेही नाव या लिस्टमधून वगळले जाऊ शकते.
अशी करा ऑनलाइन ई-केवायसी
आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेशी लिंक केलेला नाही. यामुळेच हजारो शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडकले आहेत. ही प्रक्रिया खूप सोपी आहे.
सर्वप्रथम http://pmkisan.gov.inवर जा.
होम पेजवर फार्मर्स कॉर्नरच्या विभागात e-KYC चा पर्याय निवडा.
नवीन पेज उघडताच आधार कार्ड क्रमांक टाका.
आता शेतकऱ्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
साइटवर ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ई-केवायसी करून घ्या.
इथे करा संपर्क
PM Kisan Yojana च्या 13व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांना अधिकृत ईमेल आयडी [email protected]वर संपर्क साधता येईल. याबरोबरच पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधता येईल.