मुंबई : जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की पावसाळ्यात कोणत्या पिकांची लागवड केली पाहिजे तर आज आम्ही तुम्हाला अशा तीन पिकांबद्दल सांगणार आहोत. ज्याची लागवड करून तुम्हाला लाखोंचा नफा मिळवता येईल. या पिकाच्या लागवडीसाठीचा खर्च देखील हजारांमध्येच असेल. तसेच कमी वेळेत या पिकांची लागवड करून शेतकरी मोठी कमाई करू शकतात.
ही आहेत तीन पिके
पालक : खरीप हंगामात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पालक पिकाची लागवड करत आहेत आणि या पिकातून मोठी कमाई करत आहेत. ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात पालकाला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी पालकाची लागवड करू शकतात. एक एकरमध्ये पालक लागवडीसाठी 15 हजार रुपये खर्च येतो. पालक लागवड करायची असेल तर जून ते जुलै पर्यंत त्याची पेरणी करावी. पालक तयार होण्यासाठी 45 ते 50 दिवस लागतात. त्यानंतर पाच ते सहा वेळा कापणी करता येते. यातून तुम्ही तीन महिन्यात दीड लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकतात.
कोथिंबीर : या पिकाला देखील पावसाळ्यात चांगला बाजारभाव मिळतो. याची लागवड जून ते जुलै या कालावधीत केली जाते. एक एकरमध्ये कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी 20 हजार रुपये खर्च येतो. कोथिंबिरीच्या दोन महिन्यात कालावधीत शेतकरी 1 ते दीड लाख रुपये उत्पन्न सहज मिळवू शकतो.
मेथी : या पिकाची देखील शेतकरी लागवड करू शकतात. एक एकरामध्ये मेथी लागवडीसाठी सुमारे 10 हजार रुपये खर्च येतो आणि 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतात. पेरणीनंतर मेथी तयार होण्यासाठी 45 ते 50 दिवस लागतात. शेतकरी या तीन पिकांची लागवड करून कमी खर्चात आणि कमी वेळेत भरघोस उत्पन्न मिळवू शकतात. तसेच या तिन्ही पिकांवरील कीड व रोगांचा प्रभाव कमी दिसून येतो.