मागील वर्षी कीटकनाशक व त्याच्या चुकीच्या पद्धतीने फवारणीमुळे व कीटकनाशकांच्या अतिरिक्त मात्रेमुळे विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्राण गमावावे लागले. असा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी आम्ही क्रमशः बाजारात उपलब्ध कीटकनाशक किती मात्रेत वापरावे याचा तज्ञांनी दिलेला सल्ला व मात्रा शेतकरी बांधावासाठी देत आहोत.
थायमेथोक्झाम २५% डब्ल्यू.जी (Actra)
कीटकनाशकवापरण्याचे सरासरी प्रमाण प्रमाण : ४० ग्राम / एकर
पिके – कापूस – तुडतुडे, फुलकिडे पांढरी माशी
भेंडी – तुडतुडे, पांढरी माशी, मावा
आंबा – तुडतुड,गहू, मोहरी, बटाट्यावरील मावा
टोमॅटो/वांगी- पांढरी माशी
भाता – खोड कीड
महत्वाचे:- कीटकनाशक पानावर संपूर्ण भागावर पसरवून पानाच्या मागील भागावरील कीटकांना मारते हे सर्व पिकांवरील तुडतुडे आणि फुल किडे पांढरी माशी,मावा इ. विषाणूजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या कीटकांचा नायनाट करते. शिफारशीनुसार फवारल्यास पिकांसाठी व मित्र किडीसाठी अपायकारक नाही. पिकांना दीर्घकाळ संरक्षण पुरवते व त्यामुळे उत्पादनात वाढ होते. इतर कीटकनाशकांमध्ये मिसळण्यास देखील योग्य आहे.
सूचना: वरील मात्रा हे स्टॅंडर्डनुसार आहे ,पिकानुसार त्यात बदल होऊ शकतो.