मुंबई : गुंतवणूकदारांना बाबा रामदेव यांची फूड प्रोसेसिंग कंपनी पतंजली फूडसने केले मालामाल! एका लाखाचे 4 कोटी मिळवून दिले. स्टॉकने दिला 39000% परतावा आणि आता प्रति शेअर 5 रुपये लाभांश जाहीर केला. ही बंपर कमाई किती दिवसात? ते जाणून घ्या …
पतंजली फूड्स ही बाबा रामदेव यांची एकमेव सूचीबद्ध कंपनी आहे. ही शुद्ध देशी कंपनी फूड प्रोसेसिंग क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी आजच्या घडीला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देत आहे. त्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, डाबर अशा अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
बाबा रामदेव समर्थित पतंजली फुड्स लिमिटेड कंपनी पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना लाभांश म्हणजेच नफ्यातील काही भाग वितरित करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 5 रुपये लाभांश जाहीर केला आहे. त्याची रेकॉर्ड डेट 26 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. एक्स-डिव्हिडंडची तारीख 23 सप्टेंबर असेल. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे बाजारपेठा बंद राहतील. एकमेव सूचीबद्ध कंपनी ही या समूहाची एकमेव सूचीबद्ध म्हणजे शेअर बाजारात लिस्टेड कंपनी आहे.
शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo
50 हजार कोटी बाजार भांडवल टप्पा ओलांडला
अलीकडेच पतंजली फूड्सचा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलाने 50,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,415 रुपये आहे. मात्र, आता शेअरमध्येही नफा-वसुली होताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी, बाबा रामदेव समर्थित कंपनीचा हा स्टॉक मुंबई शेअर बाजारात ₹ 1,338.45 वर बंद झाला.
पतंजली फूडसने केले मालामाल; 39,000% रिटर्न्स!
पतंजली फूडस कंपनीचा शेअर मुंबई बाजारात तीन वर्षांपूर्वी अवघ्या 3 रुपये 54 पैशाला लिस्ट झाला होता. गेल्या तीन वर्षांत, रामदेव बाबांच्या कंपनीचा शेअर बीएसईवर 3.54 रुपयांवरून 1,415 रुपयांपर्यंत वाढला आहे. नफा वसुलीमुळे तो आता परवा ₹ 1,338.45 वर बंद झालेला आहे. मात्र, तीन वर्षांच्या या अल्प कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बाजारात साधारणतः दुप्पट-तिप्पट रिटर्न वर्ष दोन-वर्षाच्या काळात मिळतात. लाखाचे दोन-तीन लाख होतात; पण पतंजली शेअरने तब्बल 39,250 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे.
एका लाखाचे तीन वर्षात चार कोटी कसे झाले?
जेव्हा हा शेअर तीन वर्षांपूर्वी बाजारात लिस्ट झाला, तेव्हा किंमत होती 3.54 रुपये. म्हणजे तुम्ही त्यावेळी एक लाख रुपये गुंतविले असते तर तुम्हाला 28,248 शेअर्स मिळाले असते. तीन वर्षानंतर शेअरची किंमत सर्वोत्तम झाली ती 1,415 रुपये. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या 28, 248 शेअर्सची किंमत झाली ₹ 3,99, 71,751 (तीन कोटी नव्व्यांनव लाख 71 हजार 751 रुपये)! याचाच अर्थ, अवघ्या तीन वर्षात बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स या देशी कंपनीने तुमच्या एका लाखांचे चार कोटी केले असते. ज्यांनी गुंतविले, ते मालामाल झाले.
इतक्या कमी कालावधीत इतकी बंपर कमाई करून देणारा अलीकडच्या काळात हा पहिलाच शेअर ठरला आहे. विशेषत: फूड प्रोसेसिंग उद्योगात तर हा चमत्कारच आहे.
Claim your super offer now; More than 100+ offers 👇
आता टार्गेट एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे
पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी ॲग्रोवर्ल्डला सांगितले, की आता टार्गेट एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे आहे. समूहाचा व्यवसाय अडीच पटीने वाढून येत्या पाच ते सात वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. पतंजली फूडसशिवाय आता समूहातील इतर चार कंपन्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) देखील आणले जातील. रामदेव यांचा दावा आहे, की त्यांचा ग्रुप येत्या काही वर्षांत पाच लाख लोकांना रोजगार देईल.
रामदेव यांच्या लार्जर-दॅन-लाइफ प्रतिमेने बनवलेला ब्रँड
मुळातच एका दशकात 100 ते 10,000 कोटी रुपयांपर्यंत जाणे, हा एक चमत्कार होता. तोही कंपनीने आधी करून दाखविला आहे. खरेतर, हा ब्रँड जाहिरातींनी बनवला नाही, तर रामदेव यांच्या लार्जर-दॅन-लाइफ प्रतिमेने बनवला आहे. ब्रँडला मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्याची आवश्यकता मुळीच नव्हती. मात्र, प्रतिस्पर्धी एचयूएल आणि कोलगेट पामोलीव्ह वैगेरे प्रतिस्पर्धी कंपन्या तब्बल 10% जाहिरातींवर खर्च करत आहेत. त्यामुळे पतंजलीने जाहिरातींवर 3% पेक्षा जास्त खर्च करण्यास सुरुवत केली आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
- पाण्यात बुडणारी शहरे : आयएमडीची अत्याधुनिक फोरकास्ट यंत्रणा लवकरच! A1 Solution
Comments 2