मुंबई : कांद्याच्या चढ उतरत्या भावामुळे राज्यात वातावरण चांगलेच तापलेले आहेत. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. अशाचवेळी कांद्याविषयक मोठी बातमी समोर आली आहे.
पिंपळगाव बसवंत आणि लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याच्या भावात काही दिवसांपासून वाढ होतांना दिसून आली आहे. यासाठीचे कारण हे, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील व्यापार बकरी ईद निमित्त बंद असल्यामुळे भारतीय बाजारपेठेतील कांद्याची मागणी वाढली आहे. स्थानिक बाजारपेठेतील आवक, देशांतर्गत व निर्यातीसाठीच्या कांद्याच्या मागणीचा विचार करता याविषयीची भूमिका लवकरच स्पष्ट होणार असल्याचे निर्यातदारांकडून सांगितले जात आहे.
सेंद्रिय स्लरी शेतीसाठी अमृत 👇
https://eagroworld.in/amrit-for-organic-slurry-farming/
पाकिस्तानात जुलै महिन्यात कांद्याची निर्यात सुरु होणार असल्याने येणाऱ्या काळात कांद्याच्या भावात चढ उतार होणार असून भावात उचांकी बघायला मिळणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश येथे बकरी ईदची सुटी असल्याने जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी वाढली आहे. याविषयीची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇
https://youtu.be/vJ7zM35MvpM
दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून सरासरी 50 ते 2000 रुपयांची वाढ दिसून आलेली आहे. तसेच लांबणीवर पडलेल्या पावसामुळेही कांद्याचे भाव वाढल्याचे म्हटले जात आहे. बांग्लादेशसाठी कांद्याच्या गाड्यांची लोडींग सुरु झालेली आहे. बकरी ईदची सुटी असल्याने कांद्याची निर्यात थांबली होती तरी सुटी संपल्याने बांग्लादेशसाठी उन्हाळी कांदा निर्यातीस सुरुवात झाली आहे. नाफेडतर्फे देखील मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला जात असल्याने याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला असून कांद्याच्या भावात वृद्धी बघायला मिळत आहे.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कांदा 4/07/2023 |
|||
खेड-चाकण | क्विंटल | 125 | 1500 |
कराड | क्विंटल | 126 | 1700 |
पुणे | क्विंटल | 11504 | 1100 |
पुणे -पिंपरी | क्विंटल | 17 | 1200 |
कल्याण | क्विंटल | 3 | 1600 |
लासलगाव | क्विंटल | 24000 | 1300 |
03/07/2023 | |||
कोल्हापूर | क्विंटल | 5588 | 1100 |
अकोला | क्विंटल | 450 | 1200 |
औरंगाबाद | क्विंटल | 3313 | 900 |
मुंबई – मार्केट | क्विंटल | 14575 | 1400 |
सातारा | क्विंटल | 86 | 850 |
मंगळवेढा | क्विंटल | 260 | 1500 |
जुन्नर – नारायणगाव | क्विंटल | 5 | 1200 |
कराड | क्विंटल | 99 | 1500 |
सोलापूर | क्विंटल | 14648 | 1100 |
बारामती | क्विंटल | 231 | 1000 |
धुळे | क्विंटल | 106 | 810 |
जळगाव | क्विंटल | 613 | 1000 |