देशभरासह महाराष्ट्रासाठीही पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. देशातील काही राज्यांवर आणखी एका नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या 5-6 दिवसांपासून तडाखा देत असलेला अवकाळी पाऊस सुरूच राहणार आहे.
देशभरातील हवामानाचे स्वरूप पुन्हा एकदा बदलले आहे. सध्या देशाच्या पर्वतीय भागात बर्फवृष्टी होत आहे, तर सपाट भागात थंडीचा कहर वाढत आहे. दुसरीकडे, मैदानी भागात पावसाळा सुरू असल्यासारखे चित्र दिसत आहे. उत्तरेकडील व दक्षिणेतील काही राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. राजस्थानमध्येही मुसळधार सुरू असून पुढील तीन दिवसांत तापमान 4 अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज आहे.
या राज्यांवर तयार झालेय कमी दाबाचे क्षेत्र
उत्तर-पश्चिम राजस्थान आणि आसपासच्या भागात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. आणखी एक नवे चक्रीवादळ गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या लगतच्या भागांवर आहे. दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात चक्रीवादळ 4.5 किलोमीटरपर्यंत पसरलेले दिसत आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि मलाक्काच्या लगतच्या सामुद्रधुनीवरही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
महाराष्ट्रात नव्याने पुन्हा पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज आकाश ढगाळ असेल आणि हलका पाऊस पडेल. येत्या काही तासात हळूहळू हा पाऊस मध्य भारतातून निघून महाराष्ट्र आणि पुढे दक्षिण भारताच्या काही भागात पोहोचेल. दिल्ली परिसरात कालही हलका-रिमझिम पाऊस झाला. आज सकाळपासून अनेक भागात हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
पश्चिम हिमालयाजवळ एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स
राजस्थान, गुजरात आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पावसाने सध्या अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्स हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे हवामानात हे मोठे बदल झाले आहेत. पश्चिम हिमालयापर्यंत पोहोचणारा वेस्टर्न डिस्टर्बन्स आता पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची अपेक्षा आहे. 29 नोव्हेंबरपर्यंत त्याचे अती तीव्र दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊ शकते. पुढील 48 तासांत त्याचे दक्षिणपूर्व बंगालमध्ये चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. 30 नोव्हेंबरपासून पश्चिम हिमालयाच्या जवळ एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स पोहोचू शकतो, असा अंदाज आहे.
विदर्भ, मराठवाडा परिसराला पावसाचा तडाखा
येत्या 24 तासांत, अंदमान-निकोबार बेटे, तटीय तमिळनाडूचा काही भाग आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्यावर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम हिमालयात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट होऊ शकते.
उत्तर-मध्य महाराष्ट्रातही पाऊस
गेल्या 24 तासांत विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेश, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडला. तामिळनाडू, पूर्व राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग आणि उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. खासगी हवामान संस्था स्कायमेटने सांगितले की, गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, केरळ, लक्षद्वीप आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये हलका पाऊस झाला. पश्चिम हिमालयाच्या वरच्या भागात हलकी बर्फवृष्टी झाली. या भागात आजही हलकी बर्फवृष्टी होऊ शकते. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज दाट धुके पडले होते. देशात अनेक ठिकाणी तापमान कमी झालेले असून वातावरण ढगाळ आहे.