वाशिम : वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. यात राज्यातील संत्री उत्पादक शेतकरी अडचणी सापडले आहे. दरम्यान या अडचणी कमी करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहे. संत्री उत्पादकांच्या अडचणी कमी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादक संघाची स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
संत्री पिकाच्या उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच पिकाबाबत योग्य मार्गदर्शन, शास्त्रीय सल्ला, आधुनिक उपकरणांची कमतरता अशा अनेक अडचणींचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता काही संत्रा उत्पादक शेतकरी समोर आले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अडचणींचा सामना कमी करण्यासाठी संत्रा उत्पादक संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे समूह हे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रमुख गावांमध्ये तयार केले जाणार आहे. यासाठी तालुक्याचे प्रतिनिधी प्रमुख असतील आणि हेच संत्रा उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचे सदस्य राहणार आहे. संत्र उत्पादनासाठी मार्केट रिसर्च, मार्केटिंग सिस्टीम, तंत्रज्ञान, प्रक्रिया केंद्र या विषयांवर संघाकडून योजना बनविली जाणार आहे. जेणेकरून अधिक उत्पादनासह संत्र्याला चांगला दर मिळण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कापसाच्या भावात वाढ ; येथे मिळतोय सर्वाधिक दर
- आर्थिक संकटात किसान क्रेडिट कार्ड करणार मदत ; जाणून घ्या.. काय आहे प्रक्रिया