मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) राज्य मंत्रिमंडळात झालेल्या आजच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज होणारी बैठक महत्त्वाची मानली जात होती. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या आजच्या या बैठकीत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच ऊर्जा विभागाकडून उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.


तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- सोमवार दि. 11 मार्च, 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय -संक्षिप्त
- FPC कार्यशाळा – ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगाव व नाशिकमध्ये 16 मार्चला (शनिवारी) फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कार्यशाळा