मुंबई : राज्यातील वातावरणात बदल झालेला पुन्हा दिसत आहे. आता आजपासून पुढील चार दिवस राज्यात पाऊस राहणार आहे. कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट आहे, ते जाणून घ्या मान्सून अपडेट … Monsoon Update
राज्यात 4 दिवस पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविली असली तरी विदर्भात मात्र 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत पावसाची शक्यता आहे. अमरावतीचे हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी विदर्भासाठीचा हा अंदाज वर्तवला आहे.
पुन्हा का परतला राज्यात पाऊस?
मान्सूनसाठीची जी ट्रफरेषा आहे, ती सध्या सामान्य स्थितीत आहे. पूर्व-पश्चिम वाऱ्याचे जोड क्षेत्र सध्या दक्षिण भारतावर आहे. हे कमी-जास्त दाबाचे क्षेत्र असते, ज्यावर पावसाचे प्रवास ठरतात. हे क्षेत्र येत्या 2 ते 3 दिवसात उत्तरेकडे सरकत, अशी शक्यता आहे. यामुळे आता राज्यात पाऊस पुढील काही दिवस सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे विदर्भात 5 ऑगस्टपासून पाऊस वाढू शकतो. याशिवाय, किनारपट्टी भागात मुसळधार बरसू शकते.
शेत-शिवारात मशागतीच्या कामांना पुन्हा ब्रेक
गेले काही दिवस विदर्भ वगळता राज्यात फारसा पाऊस नव्हता. गेल्या आठवडाभरातपासून विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. काही ठिकाणी फक्त तुरळक पाऊस पडत होता. पावसाने उघडीप घेतल्याने विदर्भासह राज्यभरात शेत-शिवारांत अंतर्गत मशागतीची कामे वेगात सुरू झालेली आहेत. पुन्हा नव्याने येणाऱ्या पावसामुळे त्या कामांना ब्रेक लागू शकेल. राज्यात आता खरेतर अतिरिक्त पाऊस झाला आहे. उघडीप आणि ऊन आवश्यक आहे. त्यातही सध्याचा पाऊस हा भात पीक वगळता इतरांना नुकसानकारकच ठरणार आहे.
ढगाळ वातावरण मात्र पावसाची हुलकावणी
गेले 2-3 दिवस राज्यातील वातावरण बदलत आहे. पाऊस नसल्याने गेले काही दिवस वातावरणात उकाडा जाणवत होता. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी सायंकाळी ढगाळ वातावरण तयार व्हायचे मात्र पावसाची हुलकावणी बसत होती. गेल्या दोन दिवसात नवी मुंबई, ठाण्यासह काही भागात रात्री चांगला पाऊस झाला. आहे.
कोणत्या जिल्ह्यात आहे पावसाचा अलर्ट?
आयएमडीच्या अंदाजानुसार, यावेळी गुरुवार, 4 ऑगस्टपासून काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. अकोल्यात काल सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवस राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस बसरणार आहे. हवामान खात्याने शुक्रवारी कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी, 6 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी (6आणि 7 ऑगस्ट) कोकण, गोव्यासह काही ठिकाणी मुसळधार, तकाही ठिकाणी तुरळक तर काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
आज पुणे, साताऱ्यासह विदर्भात चांगला पाऊस
हवामान अंदाजानुसार, आज, शुक्रवार, 5 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर; कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यासह मराठवाड्यात शनिवारी पाऊस
मुंबई, ठाणे, पालघरसह मराठवाड्यात शनिवारी, 6 ऑगस्ट रोजी पाऊस होईल. या दिवशी मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. याशिवाय, कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा; तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यातही उद्या, शनिवारी पावसाची शक्यता आहे.
नंदुरबार, नाशिकमध्ये रविवारी पाऊस
नंदुरबार, नाशिकमध्ये रविवारी, 7 ऑगस्ट रोजी पाऊस राहील. पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी; तसेच वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागातही हवामान खात्याने रविवारी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
7, 8 ऑगस्टला विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
आयएमडी अंदाजाव्यातिरिक्त, हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी 7, 8 ऑगस्टला विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत विदर्भात पाऊस राहील, असा त्यांचा अंदाज आहे. त्यानुसार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी 5 ते 8 ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 7 व 8 ऑगस्ट रोजी अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो. पूर्व विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान विदर्भात बहुतेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज
Be Alert ! शुक्रवारपर्यंत पुढील 4 दिवस राज्यात पाऊस – पुणे वेधशाळेचा अंदाज … जाणून घ्या सविस्तर
ऑगस्ट मान्सून Good News : महाराष्ट्रात 5 पर्यंत उघडीप, महिन्याचा पावसाचा अंदाज आयएमडी आज सायंकाळी जाहीर करणार; जुलैमध्ये मुसळधार विक्रम!
शेतजमिनी यापुढे खाणी, उद्योग-निवासी बांधकामांसाठी वापरण्यास बंदी; कुठल्या सरकारने घेतला हा निर्णय, ते जाणून घ्या…