मुंबई : उत्तर महाराष्ट्र, औरंगाबाद-जालना जिल्ह्यात आज आकाश ढगाळ राहून सामान्य असा हलका ते मध्यम पाऊस राहू शकेल. पावसाचा कोणताही विशेष अलर्ट मात्र हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही. राज्यात इतरत्र मात्र मुसळधार पावसासाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आलेले आहेत. सध्या मुंबईत पावसाचा जोर वाढला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
निर्मल रायझामिका 👇
पूर्वानिमानित अलर्टनुसार यलो झोन असलेला नाशिक जिल्हा तूर्तास ग्रीन झोनमध्ये दिसत आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी आधीही ग्रीन अलर्ट होता, सद्यस्थितीनुसार सायंकाळपर्यंत त्यात बदल होण्याची शक्यता दिसत नाही. पुणे जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. तिथे आताही मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम दिसत आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, मध्य प्रदेशातील काही भाग, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आणि रायगडमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. गोवा, कारवार, तेलंगणाचा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यात तसेच नांदेड जिल्ह्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. हिंगोली, अमरावतीतही मुसळधार सुरू आहे. मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत दुपारपासून सलग पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी 40 ते 70 मिमी पाऊस आतापर्यंत नोंदविला गेला आहे. साऊथ मुंबईत पावसाचा जोर तुलनेने पश्चिम उपनगरापेक्षा जास्त दिसत आहे. नवी मुंबईतही संततधार कायम आहे. रायगडमधील खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात डोंगरांना भेगा पडल्याचे सांगितले जात आहे. अप्पर वर्धा धान 65% भरले आहे. धरणाचे दहा दरवाजे उघडले जाणार आहेत.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र अन् घाट क्षेत्रात रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागाने 21 आणि 22 जुलै रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र अन् राज्यातील घाट क्षेत्रासह कोकणा रेड अलर्ट जारी केला आहे. दोन दिवसात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 204.4 मिमी पेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार होण्याची शक्यता आहे. उद्या, 21 जुलै रोजी उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार बरासण्याची शक्यता आहे.