नवी दिल्ली : (MSP) प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा केंद्र सरकारने नुकताच 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला आहे. यानंतर लगेच आता केंद्र सरकारने खरीप हंगामातील एकूण 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजेच हमीभावात वाढ केली आहे. चला तर जाणून घेऊया ही 14 पिके कोणती ?, किती हमीभाव मिळाला ?.
धान, कपाशी अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल (19 जून) रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी हमीभाव वाढीवर चर्चा झाली. या चर्चेअंती बैठकीत हमीभावसंदर्भात निर्णय घेण्यात आला. यावेळी एकूण 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
केंद्र सरकारने 2018 साली पिकाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला होता. हाच नियम लक्षात घेऊन केंद्र सरकारने बुधवारी नवे हमीभाव ठरवले असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
14 पिकांचे हमीभाव (MSP) खालीलप्रमाणे…
धान्य |
२०२४-२५ |
२०२३-२४ |
फरक रक्कम |
तांदूळ (सामान्य) | २,३०० | २,१८३ | ११७ |
तांदूळ (ए ग्रेड) | २,३२० | २,२०३ | ११७ |
ज्वारी (हायब्रीड) | ३,३७१ | ३,१८० | १९१ |
ज्वारी (मालदंडी) | ३,४२१ | ३,२२५ | १९६ |
बाजरी | २,६२५ | २,५०० | १२५ |
रागी | ४,२९० | ३,८४६ | ४४४ |
मका | २,२२५ | २,०९० | १३५ |
तूर | ७,५५० | ७,००० | ५५० |
मूग | ८,६८२ | ८,५५८ | १२४ |
उडीद | ७,४०० | ६,९५० | ४५० |
भुईमुग | ६,७८३ | ६,३७७ | ४०६ |
सूर्यफूल | ७,२८० | ६,७६० | ५२० |
सोयाबीन | ४,८९२ | ४,६०० | २९२ |
सोयाबीन | ९,२६७ | ८,६३५ | ६३२ |
रामतीळ | ८,७१७ | ७,७३४ | ९८३ |
कापूस (मध्यम धागा) | ७,१२१ | ६,६२० | ५०१ |
कापूस (लांब धागा) | ७,५२१ | ७,०२० | ५०१ |