जळगाव – खासदार उन्मेष पाटील, नगरसेवक मयूर कापसे तसेच पंचायत समितीचे सदस्य हर्षल चौधरी यांनी ॲग्रोवर्ल्डच्या कार्यालयास भेट दिली. खासदार श्री. पाटील यांनी ॲग्रोवर्ल्डच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी घेतली तसेच कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. खासदार श्री. पाटील दीड तास ॲग्रोवर्ल्डच्या कार्यालयात होते. यावेळी भविष्यातील काही येऊ घातलेल्या नवीन उपक्रमाबद्दलही चर्चा झाली.
किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk
ॲग्रोवर्ल्डची टीम शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. एवढेच नव्हे तर शेती व शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या या कामामुळे कळत नकळतपणे ॲग्रोवर्ल्डमधील सहकारी असंख्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहेत. आणि ही भावना सर्व सहकाऱ्यांच्या आंतरात्म्याला नक्कीच सुखावणारी आहे. कारण, इतर नोकऱ्यांमध्ये आपण दुसऱ्यांसाठी काही करत असल्याचे समाधान मिळत नसल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
प्रतिकूल परिस्थितीतही ॲग्रोवर्ल्डने दर्जा व सातत्य राखले
मी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ॲग्रोवर्ल्डची वाटचाल पहात आहे. या क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व खूप मोठे चढ-उतार असतानाही ॲग्रोवर्ल्डने दर्जा व सातत्य कायम राखले आहे. एवढेच नव्हे तर सध्या थोड्या वाढीव पगारासाठी सहा महिन्यात नोकरी बदलण्याचा ट्रेंड असताना सहा – सहा वर्षांपासून एकाच संस्थेत काम करणारी टीम बघायला मिळणे आता दुर्मिळ आहे. मात्र, ॲग्रोवर्ल्डमधील कौटुंबिक, मोकळे वातावरण व कामाचे समाधान यामुळे या संस्थेत एकाच ठिकाणी सहा वर्षांपासून काम करणारे सहकारी देखील मी पहात आलो आहे. ॲग्रोवर्ल्डकडे असलेला डेटाबेस व नेटवर्क याचा भविष्यात त्यांना नक्कीच मोठा उपयोग होईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ॲग्रोवर्ल्ड हा मला माझा परिवार वाटतो. या परिवाराला कधीही, कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर मला हक्काने सांगा, मी त्यासाठी नक्कीच तत्परतेने उभा असेल, असे आश्वासनही खासदार श्री. पाटील यांनी यावेळी दिले. ॲग्रोवर्ल्डचे
संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. हेमलता जावळे यांनी सूत्रसंचालन केले तर पल्लवी खैरे यांनी आभार मानले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
Comments 1