मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मान्सूनच्या आगमनाची आतुरता लागली असून यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर आता अरबी समुद्रात मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, आता 27 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. त्यामुळे मान्सूनचे लवकरच कोकणात आगमन होणार आहे.
गेल्या 2 – 3 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. पण काही ठिकाणी पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेमुळे उकाडा जाणवत आहे. पुढील काही दिवस मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताही हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे.
या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
रत्नागिरी, पुणे, सिंधुदूर्ग, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, धाराशिव, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज (दि. 16 मे 2025) पावसाची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, अहमदनगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांनाऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.
लवकरच मान्सून कोकणात
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, लवकरच मान्सून कोकणात दाखल होणार आहे. येत्या 2 जूनपर्यंत कोकणात दाखल होईल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत दाखल होण्यास सुरुवात होईल.
