मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी झाला. मात्र, ज्या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी दिली त्या भागातील शेतात पाणी साचले होते, अशा भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यातील उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील पाऊस गायब झाला आहे. राज्यात गेल्या 8 ते 9 दिवसांपासून रजेवर असणारा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय केव्हा होणार याबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेली माहिती आपण जाणून घेणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. विदर्भापासून मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही पावसाने उसंत घेत या सर्वच भागांमध्ये तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) ट्विटर (X) च्या माध्यमातून दिला आहे.
IMD : या जिल्ह्यांना यलो अलर्ट
सिंदुधुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.