• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Monsoon Update : लांबलेला मान्सून आता नेमका येणार तरी किती दिवसांनी?

बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात वाहणार जोरदार वारे, समुद्रही खवळणार ; मान्सूनपूर्व पाऊस पडला तरी शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 7, 2023
in हवामान अंदाज
0
Monsoon Update

अरबी समुद्रात मुंबईपासून 1,000 किलोमीटरवर तीव्र झालेले बिपरजॉय चक्रीवादळ

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Monsoon Update… अरबी समुद्रात अचानक उद्भवलेल्या चक्रीवादळाने लांबलेला मान्सून आता नेमका येणार तरी किती दिवसांनी, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे, येत्या 3 दिवसात बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय, समुद्रही खवळणार आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडला तरी शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी पहाटेपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉय अजून तीव्र झाले आहे. सध्या ते गोव्यापासून 890 तर मुंबईपासून 1,000 किलोमीटर अंतरावर आहे. हे वादळ पुढील 24 तासात अत्यंत तीव्र होण्याची व उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 3 दिवसात वादळ पाकिस्तानकडे सरकत कमजोर होत जाईल.

चक्रीवादळाची येमेनच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल.

160 किलोमीटर वेगाचे विध्वंसक तुफान

बिपरजॉय हे अतिशय विध्वंसक चक्रीवादळ असणार आहे. समुद्रात त्याचा वेग 135-145 किमी ताशी असेल. कदाचित 160 किमी प्रतितास वेगानेही ते जोर धरेल. त्यामुळे समुद्रात चक्रीवादळ केंद्रापासून लगतचा किनारा व किनारपट्टी क्षेत्रात अतिशय तीव्र कठोर हवामान दिसून येण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, 8, 9 व 10 जून रोजी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्‍याचा वेग 40 ते 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार वादळी वारे वाहतील. नैऋत्य अरबी समुद्रात कर्नाटक, गोवा व महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात बिपरजॉय चक्रीवादळ कमजोर होईस्तोवर मच्छिमारांनी समुद्र क्षेत्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण। Agroworld Youtube। 👇
https://youtu.be/S4CCOSr9G9Q/

महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

बिपरजॉय वादळाचा तूर्तास तरी देशाच्या पश्चिम किनारपट्टीला धोका नाही. उत्तरेकडे सरकत हे वादळ ओमानच्या किनारपट्टीकडे जाईल, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. मात्र, गोवा, महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर ‘आयएमडी’ने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी चार दिवसात कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उपग्रह छायाचित्र : बिपरजॉय चक्रीवादळाची आताची स्थिती. ताशी 130 ते 145 किलोमीटर वेगाने हे विध्वंसक वादळ आगेकूच करील. कदाचित 160 KMPH पर्यंतही वारे वाहू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातही जोरदार वारे वाहण्याची आणि 3-4 दिवसात बहुतांश ठिकाणी हलका-मध्यम ते मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.

मान्सूनचा पाऊस आठवडाभर लांबला

चक्रीवादळामुळे मान्सूनवर विपरीत परिणाम झाला आहे. आता मान्सूनचा पाऊस किमान आठवडाभर तरी लांबला आहे. एरवी, एक जून रोजी मान्सून केरळात दाखल होतो. यंदा मात्र जूनचा पहिला आठवडा संपला तरी केरळमध्ये मान्सूनच्या पावसाला सुरवात झाली नाही. यापूर्वी हवामान खात्याने केरळात 4 जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविला होता. अरबी समुद्रात अचानक आलेल्या चक्रीवादळाने तो अंदाज चुकला आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळ थंडावायला किमान 3-4 दिवस लागतील त्यानंतर पुन्हा मान्सून सक्रीय होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकेल. म्हणजे केरळात 10 जूननंतरच मान्सून सक्रीय होऊ शकेल. मुंबई व कोकणात मान्सून पोहोचायला जूनचा तिसरा आठवडा उजाडेल. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जुलै सुरू होण्याची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. समुद्रात कोणतीही नवी स्थिती न उद्भवल्यास किंवा मान्सूनच्या प्रगतीत कोणताही अडथळा आला नाही तरी त्याचे वेळापत्रक 8-10 दिवसांनी पुढे सरकलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई आजिबात करू नये. मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होईपर्यंत प्रतीक्षा करावी. येत्या 2-4 दिवसात राज्यात पाऊस झाला तरी हा मान्सूनपूर्व पाऊस असेल. मान्सूनपूर्व पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.

Shriram Plastic

“ॲग्रोवर्ल्ड”तर्फेही तमाम शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे, की भारतीय हवामान खाते, राज्याचा कृषी विभाग यांच्या अंदाज, सूचना व मार्गदर्शनानुसारच शेतीविषयक पेरणीची कामे हाती घ्यावीत. उचित हवामान शिक्षण, पदवी आणि योग्य तांत्रिक ज्ञान नसलेल्या कोणत्याही स्वयंघोषित हवामान तज्ञांच्या अशास्त्रीय अंदाजांना बळी पडू नये – संपादक

दिल्लीत 36 वर्षांतील सर्वात कूल मे महिना

यंदाचा मे महिना हा दिल्लीत 36 वर्षांतील सर्वात कूल मे महिना ठरला आहे. ‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा दिल्लीत 36 वर्षांतील सर्वात थंड मे महिना नोंदवला गेला. सतत पडणाऱ्या पावसाने यावर्षी सरासरी कमाल तापमान 36.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले. हवामानातील बदलामुळे हे घडले आहे. याआधी उन्हाळ्यात असे हवामान कधीही पाहिले नव्हते, असे बुजुर्ग मंडळी सांगत आहेत. मात्र, आता मान्सूनचा पाऊस कदाचित जुलै आणि ऑगस्टमध्ये पडेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. कदाचित हे सारे ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत असावे. लोकं झाडे तोडत आहेत, पर्यावरण समतोल आपण बिघडवून ठेवलाय. निसर्ग काय करेल सांगता येत नाही. पुढच्या पिढ्यांचे भविष्य चिंताजनक असेल, अशी भीती बुजुर्ग व्यक्त करीत आहेत.

Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Biparjoy : आपल्या मान्सूनच्या वाटेत आडवा आलेला हा ‘बिपरजॉय’ आहे तरी कोण?
  • Monsoon Current Update : अरबी समुद्रात चक्रीवादळ; मान्सून लांबणार की वेळेवर येणार? जाणून घ्या …

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अरबी समुद्रआयएमडीपुणे वेधशाळाबिपरजॉय चक्रीवादळमान्सून
Previous Post

Onion Rate Today : कांद्याला येथे मिळतोय असा दर ; वाचा आजचे बाजारभाव

Next Post

Agricultural Universities : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास; राष्ट्रीय क्रमवारीत राज्याची फक्त 1 संस्था!

Next Post
Agricultural Universities : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास; राष्ट्रीय क्रमवारीत राज्याची फक्त 1 संस्था!

Agricultural Universities : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास; राष्ट्रीय क्रमवारीत राज्याची फक्त 1 संस्था!

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.