मुंबई : (Monsoon Update 28 June 2024) राज्यातील विविध भागात कुठं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तसेच काही भागात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतातील कामांना वेग आला असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
मान्सून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला आहे. मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणू लागला आहे. त्यामुळे आजपासून 30 जूनपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ प्रमाणात मणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने (IMD) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट
जळगाव, धुळे, नंदुरबार, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, हिंगोली, परभणी, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.
नाशिक, पालघर, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि वाशिम यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.