मुंबई : Monsoon Update… राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
उत्तर पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पूर्व पश्चिम पट्टा सक्रिय आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दरम्यान 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
‘या’ जिल्ह्यांत पावसाने लावली हजेरी
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पाऊस सुरू असून, उस्मानाबाद, बीड, लातूर, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
मान्सून परतीसाठी पोषक हवामान
मान्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मागच्या आठवड्यात राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नसून, सोमवारी (ता. 26) मान्सूनच्या परतीची सीमा कायम होती. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परत जाण्याची शक्यता आहे. विजांसह पावसाचा येलो अलर्ट धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात देण्यात आला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Alert सप्टेंबर कोल्ड : पुणे शहरात गारवा; राज्यातही तापमान 30°C पेक्षा खालावलेलेच!
- Heavy Rain Alert In Vidarbha! पुढील 3-4 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता