मुंबई – यंदा मान्सून काही केल्या देशातून जायचे नाव घेताना दिसत नाही. भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थानातून रिटर्न मान्सून संपूर्ण माघारी गेल्याची घोषणा केली होती. मात्र, आता परतीनंतरही राजस्थानात मान्सून पुन्हा दणका देणार आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रासह केरळ, ओडिशा आणि ईशान्य भारतालाही मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याचा “आयएमडी”चा अंदाज आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे सुरू राहतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आपण राज्यातील आजचे जिल्हानिहाय अलर्ट जाणून घेऊ या.

बंगालच्या उपसागराच्या वायव्येकडील कमी दाबाचा पट्टा आज पहाटे दक्षिण ओडिशाचा किनारा ओलांडून दक्षिण किनारपट्टीवर केंद्रित झाला आहे. ही प्रणाली ताशी 12 किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे दक्षिण ओडिशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. पुढील 24 तासांत छत्तीसगडकडे जाताना ते कमकुवत होत जाईल. या काळात देशभरातील अनेक राज्यात दुर्गा पूजा, नवरात्र, गरबा-दांडिया उत्सवादरम्यान हलका-मध्यम तर काही भागात मुसळधार-अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. दुसरीकडे, उत्तरेतील अनेक राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर उकाडा वाढत असून अनेक शहरात तापमान 30 अंशापार पोहोचले आहे.
आजचे अपडेटेड आयएमडी अलर्टस्:
रेड: जालना, बीड, लातूर, सोलापूर
ऑरेंज: हिंगोली,परभणी, नांदेड, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, पुणे, ठाणे, रायगड, मुंबई उपनगर
यलो: वाशिम, अकोला, नाशिक, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली
* उर्वरित जिल्ह्यांसाठी तूर्तास कोणताही इशारा नाही.
ही सकाळी दहा वाजताची स्थिती असून पुढील तीन तासांसाठी लागू आहे. नंतर वाऱ्यांचा वेग, दिशा आणि पावसाच्या ढगांचा प्रवास यानुसार परिस्थितीत थोडे-बहुत अंतर येऊ शकते.

रेड: जालना, बीड, लातूर, सोलापूर
ऑरेंज: हिंगोली,परभणी, नांदेड, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, पुणे, ठाणे, रायगड, मुंबई उपनगर
यलो: वाशिम, अकोला, नाशिक, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली
उर्वरित जिल्ह्यांसाठी तूर्तास कोणताही इशारा नाही.
(सकाळी दहा वाजता स्थिती, पुढील तीन तासांसाठी लागू; नंतर वाऱ्यांचा वेग, दिशा आणि पावसाच्या ढगांचा प्रवास यानुसार परिस्थितीत थोडे-बहुत अंतर येऊ शकते.)
मुंबई-ठाणे, कोकणासाठी इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ठाणे, मुंबईसाठी 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगडसाठी 28 सप्टेंबरला रेड अलर्ट असून 27 आणि 29 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट आहे. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर रेड अलर्टमध्ये बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाऊस अपडेट्स
* कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणात सध्या 104.12 TMC पाणीसाठा झाला आहे. धरण 100% भरल्याने सध्या 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असून कोयना आणि कृष्णाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
* उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज सकाळी दहा वाजता 90,000 क्यूसेक्स एवढा करण्यात आलेला आहे. या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
आंध्र-तेलंगणात धुंवाधार
या मान्सून हंगामात सर्वाधिक पाऊस असलेली आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील टॉप 5 शहरे/ शहरे पुढीलप्रमाणे –
आंध्र प्रदेश
नंदीगामा-822 मिमी,
अमरावती-779 मिमी,
विशाखापट्टणम-747 मिमी,
कलिंगपट्टणम-740 मिमी,
बापटला-720 मिमी.
तेलंगणा:
मेडक-1,604 मिमी,
आदिलाबाद-1,436 मिमी,
हकिमपेट, 973 मिमी,
खम्मम-940 मिमी,
बदराचलम-915 मिमी.