मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यात मान्सूनने कमबॅक केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात आज (दि. 19 सप्टेंबर) रोजी कोणताही अलर्ट नसून खान्देशसह मराठवाड्यात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
जळगावसह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना दि. 21 सप्टेंबर (शनिवार) रोजी यलो अलर्ट हवामान विभागाकडून ( IMD) देण्यात आला आहे. तसेच दि. 22 सप्टेंबर (रविवार) रोजी जळगावसह छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.