पुणे : केंद्रातील मोदी सरकारनं वखार महामंडळाचं खासगीकरण करण्याची योजना आखली आहे.
सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन म्हणजेच CWC ही एक ‘अ’ दर्जाची मिनी रत्न कंपनी आहे. ती आता इंडीयन एअरलाइन्सच्या धर्तीवर कॉर्पोरेटाइज्ड केली जाणार आहे. सेंट्रलच्या अखत्यारीत 19 राज्य वखार महामंडळं म्हणजेच SWC’s आहेत. त्यात राज्यांचं प्रत्येकी 50 टक्के भागभांडवल आहे. वखार कायद्यानुसार त्यांची स्थापना केली गेली होती. खासगीकरण प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून मोदी सरकार 1962 चा वखार महामंडळ कायदाच रद्द करणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या निर्णयास मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, केंद्राचं सेंट्रल आणि 19 पैकी 17 राज्य वखार महामंडळं फायद्यात असूनही खासगीकरणाचा घाट घातला जात आहे.