मुंबई : Mandhan Yojana.. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवित असते. पीएम किसान योजनेनंतर सरकारकडून आणखी एक योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून साठ वर्षांवरील शेतकऱ्याला दर महिन्याला ३ हजार रुपयांपर्यंतचे मानधन मिळणार आहे. मात्र यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरू शकतील, अर्ज कसा करावा यासह विविध माहितीसाठी आपल्याला संपूर्ण बातमी वाचणे गरजेचे आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
शेतकऱ्यांना शेती करत असतांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा मोठे नुकसान होवून उत्पादन खर्चही निघणे कठीण होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्ता प्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आणखी एक योजना राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये मिळत आहेत. पीएम किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक असून वय वर्ष ६० झाल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
असे आहे योजनेचे स्वरूप
वृद्ध काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना शेतात काम करता येणं शक्य नसते, शेतकऱ्यांना वृद्धकाळात आर्थिक मदत व्हावी, म्हणून केंद्र सरकारने मानधन योजना (Mandhan Yojana) सुरू केली आहे. वृद्धपकाळात शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह करता यावा, यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे वय साठ वर्ष झाल्यानंतर, दर महिन्याला तीन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवते.
योजनेसाठी पात्रता
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. याबरोबरच तुमचे वय अठरा वर्ष पूर्ण आणि ४० वर्षापर्यंत असाल, तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येत आहे. जर तुम्ही वरील दोन नियमात बसत असाल, तर तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत काही ठराविक रक्कम भरायची आहे. आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. जर तुमचे वय १८ वर्षे पूर्ण असेल, तर तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत दर महिन्याला ५५ रुपये भरायचे आहेत.
जर तुमचं वय ३० वर्ष असेल, तर तुम्हाला ११० रुपये दर महिन्याला ६० वर्षापर्यंत म्हणजेच ३० वर्ष भरायचे आहेत. त्याचबरोबर जर तुमचे वय ४० असेल, तर तुम्हाला दोनशे रुपये दर महिन्याला साठ वर्षापर्यंत म्हणजे वीस वर्ष भरायचे आहेत. जर तुम्ही ४० वर्षाचे असाल, तर तुम्हाला साठ वर्षापर्यंत ४८ हजार रक्कम भरावी लागेल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणे आवश्यक आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेसंदर्भातली आणि जमिनी बाबतची कागदपत्रे जमा करावी लागतात.
असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर जावे लागणार आहे. कॉमन सर्विस सेंटरवर गेल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक संदर्भातील आणि जमिनीबाबत सर्व माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला सर्व बैंक अकाउंटची माहिती देखील जमा करावी लागणार आहे. यानंतर आधार कार्डला तुमच नवीन अकाउंट आधारही लिंक केल जाईल. त्यानंतर तुम्ही तुमची रक्कम दर महिन्याला या खात्यात जमा करू शकता.
याशिवाय तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मधील कोमवर जाऊन http://maandhan.in अस सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुम्हाला ‘click here to apply’ या पर्यायावर क्लिक करायच आहे. त्यांनतर self enrollment हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर त्यावर क्लिक करायच आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर नाव ईमेल टाकून generate OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढील प्रोसेस करून अर्ज करू शकता.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇