अनेक शेतकऱ्यांनी केळी रोपांची लागवड ही जून व जुलै महिन्यात केली आहे. या महिन्यात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे सूर्यप्रकाश अतिशय कमी प्रमाणात होता. अशा अवस्थेमध्ये जमिनीत बुरशीजन्य व जिवाणूजन्य म्हणजेच खोडकूज, कंदकूज व मूळकुज रोगांचे प्रादुर्भाव होतात. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे झाडांची पाने पिवळी होऊन झाडांची वाढ खुंटते आणि कालांतराने झाडांची मर होते. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय योजना कराव्यात.
ड्रेचिंग – आळवणी
जर संततधार पाऊस सुरु असेल व खोडकूज, कंदकूज व मूळकुज आढळून आल्यास खालीलप्रमाणे ड्रेचिंग कराव्यात.
1. स्ट्रेप्टोसायक्लिन – 30 ग्रॅम आणि कॉपरऑक्सीक्लोराइड -500 ग्रॅम
200 लिटर पाण्यात घेणे,
200 मिली द्रावण प्रति झाड ड्रेचिंग करणे.
2. ब्लिचींग पावडर 4 किलो 200 लिटर पाण्यात घेणे व 200 मिली द्रावण प्रतिझाड ड्रेचिंग करणे.
ड्रेचिंग करताना सदरील द्रावण झाडावर किंवा पानांवर पडणार नाही यांची काळजी घ्यावी.
3. मायकोरायझा -100 ग्रॅम
ट्रायकोडर्मा – 250 ग्रॅम
काळा गुळ – 2 किलो
ताक – 2 लिटर
200 लिटर पाण्यात घेणे व 200 मिली द्रावण प्रति झाड रिंग पद्दतीने ड्रेचिंग करणे.
वरील तिन्ही ड्रेचिंग करताना 3 ते 4 दिवसांचे अंतर ठेवणे.
फवारणी
1. स्ट्रेप्टोसायक्लिन – 6 ग्रॅम
कॉपर ऑक्सीक्लोराइड – 15 ग्रॅम (प्रतिपंप)
2. मॅग्नेशिअम सल्फेट – 50 ग्रॅम
सूक्ष्मअन्नद्रव्य – 25 ग्रॅम
सायटोझाइम – 40 मिली (प्रतिपंप)
वरील फवारणी करताना 3 ते 4 दिवसाचे अंतर ठेवणे .
सौजन्य : नमो बायोप्लांन्ट्स
G-9 टिश्युकल्चर केळी
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील बुकिंग सुरू
मो. नं. 9623291561 – मनोहर पाटील