मुंबई : भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यासोबतच जोडव्यवसाय म्हणून पशुपालन देखील केले जाते. याच पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट व्यवसाय आहे. विशेष म्हणजे या व्यवसायातून तुम्हाला लाखो रुपयांची कमाई देखील करता येणार आहे.
पशुपालनासोबत तुम्ही आता शेणाच्या फरशा बनवू शकता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात गाई किंवा म्हशीचे शेण उपलब्ध असते. यापासून तुम्हाला शेणाच्या फरशा बनवता येणार आहे. तसेच याची ऑनलाईन आणि ऑफलाइन विक्री करू शकता. चला तर मग जाणून घेऊया भन्नाट व्यवसायाबाबत…

शेणाच्या फरशा बनविण्यासाठी खर्च किती येतो ?
साधारणता शेणापासून एक वर्ग फुटाची एक फरशी बनविण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 रुपये इतका खर्च येतो. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गाई किंवा म्हशीचे शेण वाळवू शकता. तसेच तुम्हाला या वाढलेल्या शेणाचा चुरा करण्यासाठी एक मशीन देखील घ्यावी लागणार आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 हजार ते एक लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो.
शेणापासून फरशी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
गाई किंवा म्हशीचे कोरडे शेण
निलगिरीचे पान
झाडांच्या मुळांचा चुरा
मिक्सिंगसाठी मशीन

शेणापासून अशी बनवता फरशी
सुरुवातीला गाई किंवा म्हशीचे शेण हे दोन दिवस वाळवले जाते. त्यानंतर हे वळवलेले शेण मशीनमध्ये बारीक करून घेतले जाते. त्यानंतर झाडांच्या मुळांचा चुर निलगिरी आणि अन्य झाडांची पाने बारीक केली जातात. याचे बारीक केलेल्या शेणामध्ये मिश्रण केले जाते. यानंतर यात पाणी टाकून हे शेणाचे मिश्रण एकत्रित तयार केले जाते. त्यानंतर साच्यामध्ये टाकून फरशी बनवली जाते. यानंतर तुम्हाला हवा असेल तसा आकर्षक रंग देऊ शकता. या आकर्षक रंगाच्या फारशा बनविल्यानंतर तुम्ही याची ऑनलाईन आणि ऑफलाइन विक्री करू शकता.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कुरकुमीनचे भरपूर प्रमाण असलेली आरोग्यदायी हळद !
- वादग्रस्त इलेक्टोरल बाँड्स देणगीदारांच्या यादीत तिसरा सर्वात मोठा कॉर्पोरेट देणगीदार असलेली केव्हेंटर ॲग्रो कंपनी हे प्रकरण आहे तरी काय?