मुंबई : Kusum Yojana… शेती करण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. शेतकर्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून विहीर अनुदानसारख्या विविध योजना राबविल्या जातात. अनेकदा शेतकर्यांकडून या योजनेचा लाभ घेवून विहीर खोदल्या जातात. विहीरील पाणी काढण्यासाठी लागणार्या पंपाला वेळेवर विज मिळत नाही. त्यामुळे विजेअभावी पाणी असूनही शेतकर्यांना पिकांना पाणी देता येत नाही. मात्र आता शेतकर्यांची या त्रासापासून देखील सुटका होणार आहे. विजेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कुसुम योजना राबविण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेवूया या… या योजनेची सविस्तर माहिती.
वीज निर्मिती करण्यासाठी प्रामुख्याने पाणी कोळशाचा वापर केला जातो. यामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण होत असल्याने त्याला पर्याय म्हणून केंद्र सरकारकडून सोलर एनर्जीवर भर दिला जात आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना सोलरशी जोडण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना-2022 या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना सोलर पंप बसविण्यासाठी 60 टक्के सबसिडी दिली जात आहे. त्यातच 30 टक्के रक्कम बँकेकडूल कर्ज स्वरुपात मिळत असल्याने शेतकर्यांना स्वहिस्सा म्हणून केवळ 10,000 रुपये खर्च करावा लागत आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
पैसे कमविण्याचीही संधी…
कुसूम योजनेंतर्गत सोलर पॅनल बसविल्यानंतर शेतकर्यांचा विजेचा प्रश्न तर मार्गी लागणारच आहे शिवाय उर्वरीत विज विकून शेतकर्यांना अधिकची कमाई करता येणार आहे. जर एखाद्या शेतकर्याकडे 5 ते 6 एकर शेती असेल तर या जमीनीवर सोलर प्लांट बसवून 15 से 20 लाख यूनिट वीज तयार करु शकतो. ही विज 3 रुपये प्रति यूनिट प्रमाणे विक्री करुन शेतकरी 60 लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकतो.
असा करा अर्ज
पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mnre.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करतांना तुम्हाला तुमची मालमत्ता, आधार कार्ड, बँकेचा तपशिल यासारखी माहिती द्यावी लागणार आहे. अर्ज सादर करतांना मात्र तुमची जमीन वीज केंद्राच्या 5 किलोमीटरच्या परिघात असने गरजेचे आहे. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकता.
अशी आहेत आवश्यक कागदपत्रे
पीएम कुसूम योजनेसाठी अर्ज सादर करतांना आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, ओळख पत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक, जमीनीचे कागदपत्र, मोबाइल नंबर आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.