मुंबई : कोंबडीच एक अंड सहा रूपयाला मिळतं. तर चिकन 200 रूपये पर्यंत मिळतं. पण, एक कोंबडी अशी आहे जिचं अंड 100 रुपयाला विकले जाते. त्यामूळे ही कोंबडी चर्चेत सध्या आली आहे. कोंबडीचे मांस आणि अंडी यातून मिळणारा फायदा लक्षात घेता त्यांना पाळणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. चला तर मग जाणून घेवूया एका अंड्याची किंमत बाजारात 100 रुपये असणाऱ्या या कोंबडीबद्दल..
PMFME योजनेअंतर्गत मिळवा एक कोटींपर्यंत कर्ज – संचालक सुभाष नागरे
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/se5VHhhNHKU
आम्ही आज तुम्हाला अशा कोंबडीच्या प्रजातीचे नाव सांगणार आहे, ज्याची बाजारात खूप जास्त किंमत आहे. विशेष म्हणजे या प्रजातीच्या कोंबडीची किंमत कडकनाथपेक्षा जास्त आहे. होय, आपल्या देशात असील जातीची कोंबडी आहे. या असली कोंबडीचे एक अंडे 100 रुपयांना विकत घेतले जाते. या कोंबड्या अंडी उत्पादनाच्या दृष्टीने कमकुवत मानल्या जातात. कारण, त्या वर्षाला केवळ 60 ते 70 अंडी घालतात. या कोंबड्यांचे अंडे डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
कशी असते ही कोंबडी
असील कोंबडीचं तोंड लांब आणि लाटण्याच्या आकाराचं असतं. भरपूर पंख, घनदाट डोळे आणि लांब मान हे या कोंबडीचं वैशिष्ट्ये आहे. या कोंबडीचे पाय सरळ आणि मजबूत असतात. या जातीचे कोंबडे 4 ते 5 किलो आणि कोंबड्या 3 ते 4 किलोच्या असतात. कोकराल कोंबड्यांचं वजन साडे तीन ते साडेचार किलो असते. तर पुलैट्स कोंबड्यांचं वजन अडीच ते साडे तीन किलो असते. हे कोंबडे झुंजीच्या स्पर्धेसाठीच मोठ्या प्रमाणात वापरले जातात.शेतकरी बांधवांनी असील जातीच्या कोंबड्या पाळल्या तर अंडी विकून श्रीमंत होऊ शकतात.
कोणत्या राज्यात असतात या कोंबड्या
असील जातीच्या या कोंबड्या दक्षिण पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आंध्रप्रदेशात आढळून येतात. या कोंबड्यांच्या सर्व जातींमध्ये रेजा (हलका लाल), टीकर (भुऱ्या रंगाच्या), चित्ता (काळ्या आणि सफेद सिल्व्हर रंगाच्या), कागर (काळ्या रंगाच्या) न्यूरी 89 (पांढऱ्या), यारकिन (काळ्या आणि लाल) पिवळ्या (सोनेरी लाल) कोंबड्या सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.
एका कोंबडीपासून वर्षभरात 6 ते 7 हजार रुपये कमवू शकता
असील कोंबड्या एका वर्षात फक्त 60 ते 70 अंडी देतात. पण त्यांच्या अंड्याची किंमत सामान्य कोंबडीच्या अंड्यांपेक्षा खूप जास्त आहे. असील कोंबडीच्या एका अंड्याची किंमत बाजारात 100 रुपये आहे. अशा परिस्थितीत फक्त एका कोंबड्यापासून तुम्ही वर्षभरात 6 ते 7 हजार रुपये कमवू शकता.
साहेब वेडे बनविण्याचे धंदे सोडा.६०x१००=६००० किंवा ७०x१००=७००० सहा किंवा सात हजारच होतात.
साठ सत्तर हजाराचे गणित कुठे शिकलात ?