मुंबई : Krushi Yantrikikaran…. आधुनिक युगात कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस आपण मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होत असल्याचे पाहत आहोत. यामध्ये शासन कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहे. यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे.
या योजनेच्या निधीच्या वितरणासाठी आता 56 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तर 20 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्या शासन निर्णयाची थोडक्यात माहिती आपण जाणून घेवू या..
अशी केली जाते अंबलबाजवणी
कृषी विभागामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजना तसेच बाह्य अनुदानित प्रकल्प राबविण्यात येतात. केंद्र पुरस्कृत योजनांचा वार्षिक कृती आराखडा अंतिम झाल्यानंतर सरकारला वर्षभरात एक किंवा दोन टप्प्यांत निधी मिळतो. तसेच राज्य पुरस्कृत योजनांनाही टप्प्याटप्प्याने निधी मिळतो. कृषी योजनेचा निधी टप्प्या टप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषी क्षेत्राचे कामकाजही हंगामा निहाय चालत असते.
खरीप आणि रब्बी हंगामात सुमारे 75% क्षेत्रावर खरीप हंगामातच लागवड होते. त्यामुळे खरीप हंगाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या बाबी खरीप हंगाम पूर्व व हंगाम कालावधीतच अंबलबाजवणी करणे आवश्यक ठरते. यामध्ये यंत्रणे व अवजारे बाबींचा समावेश आहे.
शासन निर्णय
या योजनेसाठी 2022-23 मध्ये 400 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. वित्त विभाग 4 जून 2022 च्या शासन आदेशातील तरतुदीनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 60 टक्के रक्कम वितरीत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तथापि, ही रक्कम संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचना वित्त विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत.
विभागाद्वारे बजेट वितरण प्रणालीवर दरमहा 7% दराने त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 60 टक्के मर्यादेत या कार्यक्रमाला 240 कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 140 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. आता 56 कोटींची रक्कम वाटपाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात 20 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे.
सन 2022-23 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंबलबाजवणी करण्यासाठी माहे 56 कोटी रुपये कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे. सदर निधी 2022-23 करिता खर्चित करण्यात येत आहे.
अश्या पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
तुमच्या कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा mahadbt farmer login. हा शब्द किंवा कीवर्ड टाकल्यावर महाडीबीटी योजनेची एक लिंक येईल त्यावर क्लिक करा. महाडीबीटी वेब पोर्टल ओपन झाल्यावर लॉगिन केल्यानंतर लॉगिन करण्यासाठी दोन पर्याय तुम्हाला दिसेल १) युजर आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉगिन करू शकता. तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी आवश्यक नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
नोंदणीसाठी ही आहेत आवश्यक कागदपत्रांची यादी
आधार कार्ड
पॅन कार्ड (असेल तर)
बँक पासबुक
सातबारा
८ अ
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉगिन करा. अर्ज करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या पर्याया सामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा. आवश्यक असलेली माहिती भरा. संपूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.