• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

केळी पट्ट्यातील टरबूज उत्पादनातील किंग

Team Agroworld by Team Agroworld
August 20, 2019
in यशोगाथा
0
केळी पट्ट्यातील टरबूज उत्पादनातील किंग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

       केळी उत्पादक म्हणून ख्याती असलेल्या डाम्भूर्णी परिसरात आता कमी कालावधीत पैसा देणारे टरबूज नाव कमवीत आहे. येथील गोकुळ मुकुंदा कोळी व राजेंद्र उत्तम पाटील यांनी फक्त ७० दिवसात एकरी २८ टन उत्पादनातून खर्च      वजा जाता १ लाख ६६ हजार रुपये उत्पन्न काढले आहे. डाम्भूर्णी हे यावल तालुक्यातील व तापी काठावरील केळी पट्ट्यातील गाव. गाळाची सुपीक जमीन व मुबलक पाण्यामुळे भरघोस उत्पादनाची हमी असलेला हा परीसर. डाम्भूर्णी हे जळगाव-यावल रस्त्यावर विदगावपासून ५-६ किमीवरील गाव. गोकुळ मुकुंदा कोळी व राजेंद्र उत्तम पाटील हे दोन्ही मित्र एकमेकाच्या सल्ल्याने एकत्रच शेती करतात. मागील काही वर्षांपासून ते टरबूजाच्या उत्पादनाकडे वळले आहेत. मागील वर्षी नियोजन चुकल्याने ११ बिघे क्षेत्रात फक्त ६० टन उत्पादन आले होते. यावर्षी मात्र लागवडीपासूनच सर्व बाबींची काळजी घेतल्याने दर्जेदार व भरपूर उत्पादन त्यांनी घेतले आहे.

– एकूण उत्पादन एकरी २८ टन.
– एकरी खर्च ५५ हजार.
– एकरी निव्वळ नफा फक्त ७० दिवसात १ लाख ६६ हजार.

– फक्त ७० दिवसात १लाख ६६ हजाराचे उत्पन्न.
– पाणी व खते देण्याच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन.
– बुरशीजन्य रोगांचे निरीक्षण व काटेकोर उपाययोजनेमुळे गुणवत्तापूर्ण टरबूज उत्पादन.
– मेहनतीला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची जोड.

योग्यवेळी लागवड:
टरबूजाचे दर्जेदार उत्पादनात त्याच्या इतर बाबींसोबत योग्यवेळी लागवड देखील महत्वाची ठरते. या दोघा मित्रांनी ती योग्यवेळ साधून दर्जेदार उत्पादन काढले. त्यासाठी लागवडीपुर्वी ट्रेक्टरच्या सहायाने नांगरणी करून ३ वेळा रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करण्यात आली. त्यानंतर ७-७ फुट अंतरावर गादीवाफे(बेड)तयार करून त्यावर १२ एमएम लेटरल नळी टाकण्यात आली. नळीला दीड फुटावर ड्रीपर असल्याने लागवड करणे सोयीचे गेले. बेडवरील नळीच्या वर प्लास्टिक मल्चींग करण्यात आले. दिनांक ११ जानेवारी २०१९ रोजी ३ एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. ज्याठिकाणी ड्रीपर होते त्या जागी मल्चिंग कागदाला छिद्र पाडण्यात येऊन तेथे बी टोकण्यात आले.

मल्चिंग व बेसल डोस:

आधुनिक पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या तंत्रापैकी मल्चिंग हे एक आहे. मल्चिंगमुळे विविध फायदे होतात. जमिनीचे तापमान नियंत्रित राखण्यास मदत होते. वाफसा स्थिती टिकवून ठेवता येते. प्रकाश संश्लेषणास मदत होते. तण नियंत्रण होते. बेडवर मिसळून दिलेला खताचा बेसल डोस शंबर टक्के पिकास लागू पडतो. गोकुळ कोळी व राजेंद्र पाटलांनी संपूर्ण ३ एकरास मल्चिंग करून टरबूज लागवड केली. लागवडीसाठी सागर सीड्सचे रॉयल किंग हे वाण निवडण्यात आले. लागवडीसाठी ५० ग्रामची २१ पाकिटे लागली.

बेसल डोस: मल्चिंग अंथरण्यापूर्वी पुढीलप्रमाणे बेसल डोस टाकण्यात आला. डीएपी एकरी १ बैग,पोटैश एकरी १ बैग, निंबोळी पेंड एकरी २ बैग, अमोनिएम सल्फेट एकरी १ बैग दमन गोल्ड हे इंझैम बुस्टर एकरी ३० किलो, पी राईज हे फोस्फेट सोल्युबल बैक्टेरीया १५ किलो देण्यात आले.

खताचे नियोजन:
फक्त ७० दिवसात उत्पादन देणाऱ्या या पिकाला वेळेवर खतांचा डोस मिळणे आवश्यक आहे. एक-दोन दिवस जरी मागेपुढे झाले किंवा खताचे प्रमाण कमी जास्त झाले तरी उत्पादन कमालीचा फरक पडतो. बेसल डोस नंतर म्हणजे लागवडीनंतर ८ दिवसांनंतर १ दिवसाआड विद्राव्य खते दिली. एकरी ३ किलो याप्रमाणे १९-१९-१९, १२-६१-००,१३-४०-१३, १३-००-४५, ००-५२-३४ ठीबकद्वारे देण्यात आले. तसेच कैल्शीयम नायट्रेट,बोरॉन,युरिया,पोटैश व इतर सुक्ष्मअन्नद्र्व्ये देण्यात आली. पूर्ण हंगामात प्रत्येक ग्रेडची खते दोनदा दिली.
पाण्याचे नियोजन:

टरबूज हेच मूळात ९५% पाणी असलेले फळ पिक आहे. त्यामुळे त्याला भरपूर पाण्याची गरज भासते. पिकाच्या १ते ६५ दिवसाच्या कालावधीसाठी पाण्याचे वेळापत्रक करून घेण्यात आले. अर्थात जमिनीच्या मगदुरानुसार पाणी कमी-जास्त लागते. जमीन काळी कसदार असेल तर ६५ दिवसात एकरी २१ लाख लिटर तर जमीन हलक्या प्रतीची असेल तर २६ लाख लिटर पाणी लागते. पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याचे प्रमाण वाढत न्यावे लागते. पिक २५ दिवसाचे होईपर्यंत एका एकराला एक दिवसाआड ३० मिनिटे पाणी सोडण्यात आले. (साधारणत: २० दिवसात ४ लाख लिटर) पुढील २५ ते ३५ दिवसापर्यंत एक दिवसाआड एक तास (म्हणजे १० दिवसात ४ लाख लिटर), ३५ ते ४५ दिवसापर्यंत एक दिवसाआड २ तास (८ लाख लिटर) ४५ ते ६५ दिवसापर्यंत दोन ते अडीच तास (१० लाख लिटर), असे पाणी देण्यात आले.

रोग आणि कीडनियंत्रण :

या वेलवर्गीय पिकावर बुरशीजन्य रोगांचा अधिक प्रादुर्भाव होतो. कारण माती व पाण्याशी वेल व मुळ्यांचा जवळून संबध येतो. जमिनीत आढळून येणाऱ्या ९ पैकी ४ बुरशी घातक आहेत. त्यात १)रायझोप्टोनिया २) पिथीयम ३)फायटोप्थोरा ४) पेरावीलट यांचा समावेश आहे. या अपायकारक बुरशींमुळे टरबूजाच्या वेली व फळांवर विविध प्रकारचे रोग उद्भवतात. या रोगाची लक्षणे व उपाय पुढीलप्रमाणे.

1) पिथीयम: लागवडीनंतर ८ दिवसांनी जमिनीत पाणी जास्त झाल्यास ही बुरशी वाढते. हिच्या नियंत्रणासाठी ड्रीपद्वारे मेटालैक्झील एकरी २५० ग्राम पावडर दिल्यास पिथीयम नियंत्रणात येते.
2) भुरी: टरबूजाची लागवड हिवाळ्यात होत असल्याने तीव्र थंडीची बाधा होऊन भुरीचा प्रभाव वाढतो. त्यासाठी रात्री आणि दिवसाच्या तापमानावर लक्ष ठेवावे लागते. रात्रीचे तापमान २२ अंश सेल्सिअसच्या खाली गेले की भुरी येते. वेलीच्या खालची पाने पिवळी पडून करपतात. पानांवर भुरकट पावडर दिसते. भूरीच्या नियंत्रणासाठी लुना एक्स्प्रेस प्रतिपंप २५ मिली तसेच रुबीट्रोल ३० ग्राम किंवा इंडेक्स ३० ग्राम प्रतिपंप फवारणी करावी. या औषधांचा वापर गरजेनुसार किंवा हंगामात दोनदा करावा.
3) डाऊनी: तापमान ३५ ते ३८ पर्यंत वाढले की डाऊनी येतो. पाने सुरुवातीला पिवळी व तपकिरी होऊन गळून पडतात. डाउनी नियंत्रणासाठी मेटालैक्झील ३०ग्राम + डम्फोमिल ४० मिली प्रतिपंप फवारावे.
4) अल्टरनेरीया ब्लाईट: पानांवर रक्त शिंपडल्यासारखे लाल डाग पडतात. हा विषाणूजन्य रोग असून फळांचा आकार वाढू लागला की तो येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी कस्टोनिया, अमीस्टार १५ मिली अगर कवच ३० ग्राम प्रतिपंप असा वापर करावा.
5) पैराविल्ट: हा सगळ्यात घातक रोग आहे. मार्च महिन्यात तापमान वाढत जाते तेव्हा पिक ४०-४५ दिवसाचे असताना वेलीवर फलधारणा होऊ लागते व अन्नाच्या शोधात जमिनीत मुळ्या वाढू लागतात त्यावेळी जमिनीत निमाटोड हे विषाणू वाढू लागतात. त्यामुळे मुळ्याना जखमा होऊन बुरशी वाढून अन्नरस शेंड्यापर्यंत पोहोचत नसल्याने झाड वाळत जाते. फळ अर्धा ते १ किलो आकाराचे असते अशा कालखंडात या मर रोगाची लागण होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी अमावास्या-पौर्णिमेदरम्यान सुडोमोनास,ट्रायकोडर्मा, डमटटी,निमास्टोन,रुबीट्रोल २० दिवसाच्या अंतराने ड्रीपमधून एकरी १ ते २ किलो द्यावे. साधारणत: २० दिवस-४० दिवस-६० दिवस असे ते वेळापत्रक असावे.
6) साल खाणारे अळी: पिक ३५ दिवसापेक्षा अधिक दिवसाचे असताना व फळ ५० ग्रामचे झाल्यावर साल खाणारी अळी येते. ह्या अळीवर नियंत्रण आणणे आवश्यक असते अन्यथा गुणवत्ता कमी होऊन बाजारभावापेक्षा निम्मे किंवा प्रतीकिलो १-२ रुपये कमी दराने फळ विकावे लागते.
7) फळमाशी: फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास फळ किडलेले निघते. हे टाळण्यासाठी फुले लागण्याच्या सुमारास शिकारी ट्रेप लावावेत.
मधमाशांचे योगदान महत्वाचे: टरबूज उत्पादनात सर्व प्रकारची देखभाल, खते,औषधी,पाण्याइतकेच मधमाशांची भूमिका महत्वाची असते. किंबहुना या सर्व्यांपेक्षा अधिक महत्वाची असते. एकूण उत्पादनाच्या ७० ते ८० टक्के फळे मधमाशांनी केलेल्या फळसेटिंगमुळे तयार होतात.पिक २७ दिवसाचे असताना फुलधारणा होते. सुरुवातीला नर फुले लागतात. दोन-तीन दिवसांनी मादी फुले येतात. या दरम्यान संवेदनशील रासायनिक औषधांचा वापर पूर्णतः थांबवावा. वातावरणात प्रमाण अधिक असेल तर मधमाशा पिकाकडे आकर्षित होत नाहीत. त्यासाठी झेंडू व मोहरीची लागवड आधीच केलेली असल्यास या हि फुले मधमाशांना आकर्षित करतात. तसेच गुळ+ताक+बेसन पिठाची शेतात फवारणी करावी. फळसेटिंग अवस्था महत्वाची: सेटिंग अवस्थेत केमिकल्सचा वापर न करता बायोलोजीकाल औषधीचा वापर करावा. उदा. दमन+,बोंड,ओकियो यासारख्या औषधीचा वापर केल्यास फळाचे प्रभावी सेटिंग होते. अशी काळजी घेतल्यास पिक ७०ते ८० दिवसात उत्पादन निघून शेत रिकामे होते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन:
कोळी व पाटील मित्राद्वयीला मेहनती सोबत साई अग्रो सर्व्हिसेसचे महेश पाटील, दमन कंपनीचे संदीप पाटील व सागर बायोटेकचे भगवान पाटील या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले
प्रतिक्रिया:१: या पिकात भरपूर पैसा मिळू शकतो. मात्र कमी कालावधीचे पिक असल्याने मेहनत तर घ्यावीच लागते शिवाय पिकाचे वारंवार निरीक्षण करावे लागते. कमी दिवसात भरपूर उत्पन्न देणारे हे पिक आम्ही सतत घेणार आहोत. -राजेन्द्र उत्तम पाटील,मू.पो. डाम्भूर्णी ता. यावल, जि. जळगाव.फोन: ७७९८६९८८३१

हे फारच संवेदनशील पिक आहे. चुकले की हुकलेच म्हणून समजा. त्यामुळे पाणी देण्यापासून ते खत, फवारणी पर्यंत सर्व प्रकारची काळजी आम्ही घेतली. त्यामुळेच एकरी एकूण खर्च ५५ हजार वजा जाता आम्हाला एकरी १लाख ६६ हजार इतका नफा झाला. फक्त मेहनत करून भागात नाही साई सर्व्हिसेसचे महेश पाटील, सागर सीड्सचे भगवान पाटील यांचे मार्गदर्शन मिळाल्याने भरपूर व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊ शकलो. -गोकुळ मुकुंदा कोळी, डाम्भूर्णी ता. यावल, जि. जळगाव.फोन: ९७६३६६५५७१.

शेतकऱ्यांची मेहनत व योग्य मार्गदर्शनाने भरपूर उत्पादन येउन शेतकऱ्याला अधिक नफा होऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे होणारे परिणाम स्वीकारण्याची तयारी शेतकऱ्याची असली पाहिजे. -महेश पाटील, साई अग्रो सर्व्हिसेस, किनगाव,चोपडा. फोन.९९७०२२३६५९



Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अल्टरनेरीया ब्लाईटकेळीटरबूजपैराविल्टमल्चिंग
Previous Post

शेतात पाणी साचल्याने पिवळ्या पडलेल्या पिकांवर उपाय

Next Post

कडक उन्हाळ्यात घेतले काकडीचे भरघोस उत्पादन

Next Post
कडक उन्हाळ्यात घेतले काकडीचे भरघोस उत्पादन

कडक उन्हाळ्यात घेतले काकडीचे भरघोस उत्पादन

ताज्या बातम्या

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish