मुंबई : Kapus Bajarbhav… कापूस हे देशातील महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीची लागवड सुमारे 4000 वर्षापासून होत असल्याचे प्राचीन ग्रंथामध्ये आढळते. देशाचे आर्थिक स्थैर्य व शेतक-यांच्या उपजीविकेच्या दृष्टीने कापूस हे महत्वाचे पीक आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कापसाची सद्यस्थिती व बाजारभाव काय आहे? हे जाणून घेवू या.
जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांपैकी भारत एक देश आहे. जागतिक कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. देशात महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार माती व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भात यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हटले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात कापसाचे पिक घेतले जाते. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
कपाशीची इतक्या क्षेत्रात झालीय लागवड
१ जानेवारी २०२२ पर्यंतच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, 4 ऑगस्ट 2022 पर्यंत कापसाखालील पेरणी केलेल्या क्षेत्रावर नजर टाकल्यास महाराष्ट्रात 2022-23 मध्ये 41.72 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली आहे, तर 2021-22 च्या हंगामात 38.74 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली होती.
दरम्यान, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं 2022-23 च्या खरीप हंगामातील पहिला प्राथमिक अंदाज सप्टेंबर जाहीर केला आहे. त्यात कापसाचे उत्पादन 34.19 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो) आहे.
अनेक समित्यांमध्ये होतेय कापसाच्या दरात वाढ
सध्या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पहिल्याच अवकाळी पावसात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर भावात घसरण झाली आणि आता राज्यातील अनेक समित्यांमध्ये कापसाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये केवळ २५ हजार गाठी कापूस आवक झाली आहे.
कापसाच्या दरात कितीनं वाढ?
महाराष्ट्राचा विचार केल्यास, नोव्हेंबर महिन्यात कापसाला प्रती क्विंटल सरासरी 8,769 रुपये दर मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर 7,820 रुपये इतका होता. याचा अर्थ महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात कापसाच्या दरात 949 रुपयांनी वाढ झाली आहे.
किती मिळतोय नागपूर, बीडमध्ये कापसाला भाव?
21 नोव्हेंबर रोजी नागपूर बाजार समितीत केवळ 200 क्विंटल कापसाची आवक झाली. ज्याचा किमान भाव 8 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 8700 रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी 8 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बीड मंडईत 2043 क्विंटल कापसाची आवक झाली. ज्याचा किमान भाव 9 हजार 108 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 9 हजार 171 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी भाव 9 हजार 150 रुपये प्रतिक्विंटल होता.
बाजार भाव
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
01/12/2022 | ||||||
बुलढाणा | लोकल | क्विंटल | 300 | 8850 | 9170 | 8900 |
नांदेड | —- | क्विंटल | 125 | 8400 | 8800 | 8650 |
परभणी | लोकल | क्विंटल | 900 | 9000 | 9245 | 9160 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 275 | 8800 | 9100 | 9000 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)
|
1600 |
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
30/11/2022 | ||||||
बीड | लोकल | क्विंटल | 1509 | 8900 | 9009 | 8906 |
बुलढाणा | लोकल | क्विंटल | 300 | 8800 | 9120 | 9000 |
बुलढाणा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 288 | 8600 | 8800 | 8700 |
चंद्रपुर | लोकल | क्विंटल | 1599 | 8383 | 8753 | 8583 |
नागपूर | —- | क्विंटल | 1800 | 8650 | 8700 | 8700 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 396 | 8700 | 8880 | 8800 |
नागपूर | हायब्रीड | क्विंटल | 598 | 8000 | 9000 | 8500 |
नागपूर | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 570 | 8900 | 8921 | 8915 |
नागपूर | एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 2 | 8800 | 8800 | 8800 |
नांदेड | —- | क्विंटल | 110 | 8300 | 8600 | 8450 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 840 | 8650 | 8978 | 8827 |
वर्धा | ए.के.एच. ४ – लांब स्टेपल | क्विंटल | 642 | 8400 | 9000 | 8800 |
वाशिम | लांब स्टेपल | क्विंटल | 155 | 8500 | 8800 | 8600 |
यवतमाळ | —- | क्विंटल | 550 | 8600 | 8900 | |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)
|
9359 |
कापूस कधी विकावा?
ऑल इंडिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष मनीष डागा यांच्या मते, कापसाच्या बाबतीत गेल्यावर्षी वेगळी परिस्थिती होती. पीक कमी आणि मागणी चांगली होती. त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना थोड्या थोड्या प्रमाणात कापूस विकण्यास सांगितलं होतं. यावर्षी उलट परिस्थिती आहे. आम्ही शेतकऱ्यांना कापूस विकण्याचा सल्ला देत आहोत. कारण सर्व जीनिंग सुरू झाल्यावर मुहूर्तामध्ये अधिक दर दिला जातो. तेव्हा शेतकऱ्यानं थोडा कापूस विकला पाहिजे.
कापूस उद्योगाची सध्याची स्थिती वाईट आहे. कापूस, सूत आणि कापडही वाईट स्थितीत आहे. आतापर्यंत 5 लाख गाठींचं उत्पादनही झालेलं नाही. उद्दिष्ट मात्र 20 लाख गाठींचं होतं. त्यामुळे कापसाला 9500 ते 9600 दर प्रती क्विंटल मिळाल्यास शेतकरी त्यांच्याकडील 50% कापूस विकू शकतात.
महाराष्ट्रातील कापूस लागवडीसंदर्भातील अडचणी
कापूस हे राज्यातील प्रमुख नगदी पीक असल्यामुळे व कोरडवाहू लागवडीमध्ये शेतक-यांना दुसरे पर्यायी पीक नसल्यामुळे उथळ व हलक्या जमिनीत कापसाची लागवड केली जाते. असे क्षेत्र राज्यातील एकूण कपाशी क्षेत्रापैकी १५ ते २० टक्के आहे. या जमिनीवर कोरडवाहू पध्दतीत उत्पन्न कमी येते व त्यामुळे राज्याची उत्पादकता कमी आहे.
राज्यामध्ये जवळपास ९५ टक्के क्षेत्र कोरडवाहू लागवडीमध्ये आहे. राज्यातील कोरडवाहू कापसाची लागवड मॉन्सूनच्या आगमनावर अवलंबून असल्यामुळे लागवडीस उशीर झाल्यास त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कृषि निविष्ठांच्या वापराबाबत शेतक-यांमध्ये जागरूकता नसल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. तथापि उत्पादकता मात्र कमीच मिळते. कापूस वेचणीसाठी मजुरीचे दर वाढल्यामुळे खर्चात वाढ होत आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇