• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतीच्या यशात जपानी महिलांचा हात

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in यशोगाथा
0
शेतीच्या यशात जपानी महिलांचा हात
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेती करणे म्हणजे राष्ट्रकार्य आहे, असे जपानी लोक मानतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते सेंद्रिय शेती करतात. जपानच्या शेतीने आज जी काही उंची गाठली आहे; त्यामागे तेथील महिलांचो मोठा हात आहे. जपानमध्ये बालपणापासूनच मुलींना शेती कामाचे धडे दिले जातात. शेती करत असताना फार श्रमाची कामे सोडली तर इतर सर्व कामे महिलाच पार पाडतात. महिलांच्या कष्टामुळेच तेथे सेंद्रिय शेतीची पद्धत यशस्वी झाली आहे. जपानी महिलांनी फक्त शेतीच नव्हे तर शिक्षण, तंत्रज्ञान, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता सिद्ध केल्याचे मला जपान दौर्‍यात जाणवले. जपानी लोकांची प्रत्येक बाबीत मेहनत घेण्याची तयारी असते, हेही विशेषच आहे…


जपान दौर्‍यात मी तब्बल नऊ दिवस तेथील शहरी आणि ग्रामीण भागात फिरलो. तेथील संस्कृती, रुढी-परंपरा, दैनंदिन जीवन अनुभवले. राष्ट्रनिष्ठेने भारावलेले जपानी नागरिक स्वतःआधी देशहिताचाच विचार करतात. म्हणूनच 1945 मध्ये दुसर्‍या महायुद्धात झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यात बेचिराख होऊनही जपान पुन्हा एकदा उभा राहू शकला. एवढेच नाही तर वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती जपानवर कोसळतात. तरीही जपानी नागरिक हार मानत नाहीत. त्यांच्या याच लढाऊवृत्तीने मी खूप भारावलो. जपानमधील शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो तेथील नागरिक स्वतःशीच स्पर्धा करतात. जपान देशाने आज यशाची जी शिखरे पादाक्रांत केली आहेत; त्या मागे शहरी नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांचाही बरोबरीने सहभाग असल्याचे मला जाणवले. ग्रामीण भागात असलेल्या प्रत्येक घरातील लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वजणी शेतीत खूप परिश्रम घेतात. शेती आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याची त्यांची भावना आहे.
शेतातच वास्तव्य
लहानपणापासून मला जपानचे विलक्षण आकर्षण होते. त्यामुळे या देशाचा दौरा करणे माझ्यासाठी एकप्रकारे पर्वणीच होती. या दौर्‍यात मी चार दिवस तेथील ग्रामीण भागात फिरलो. तेथील शेती, शेती करण्याची पद्धती पाहिली. जपान हा छोटासा देश आहे. जमिनीचे क्षेत्रफळ कमी असल्याने तेथे छोट्या-छोट्या क्षेत्रात शेती केली जाते. क्षेत्र कमी असले तरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जपानी लोक शेतीतून भरघोस उत्पन्न घेतात. दौर्‍यावर आलेल्या आमच्या ग्रृपमध्ये 25 जण ज्येष्ठ नागरिक होते. सर्वांना शेती या विषयाची आवड असल्याने ग्रृपमधील तरुणमंडळी जेव्हा खरेदीसाठी किंवा अन्य कारणाने हॉटेलबाहेर पडत असे तेव्हा आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक तेथील शेती पाहण्यासाठी जायचो. जपानमध्ये काही मोजकी मोठी शहरे सोडली तर इतरत्र लहान-लहान खेडी आहेत. खेडी असली तरी ती आपल्या देशातील शहरांपेक्षाही पुढारलेली आहेत. या खेड्यांमध्ये शेतीचे क्षेत्र खूप आहे. जपानमध्ये ग्रामीण भागातील लोक शेतातच घर करून वास्तव्य करतात. शेतीला पूर्ण वेळ देता यावा, हा त्या मागचा उद्देश. प्रत्येक घरातील महिला व मुली शेतात राबतात. शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन महिलाच सांभाळत असल्याने पुरुषांना इतर कामांना वेळ देता येतो.
फूलशेती आवडीचा विषय
फूलशेती हा जपानी महिलांचा आवडीचा विषय. शेतातच घर असल्याने दररोज सकाळी त्या घरासमोरील बागेतून फुले तोडतात. आधी ती फुले देवाला वाहतात. त्यानंतर काही फुले संपूर्ण घरात ठिकठिकाणी ठेवतात. उरलेल्या फुलांचा गजरा तयार करून तो केसात लावतात. मगच आपल्या दैनंदिन कामांना सुरवात करतात. फुलांचा सुगंध घरात दरवळल्याने घरातील इतर लोकांना प्रसन्न वाटते. त्यामुळे कामाचा हुरूप वाढत असल्याची शास्त्रीय बाब तेथील महिलांनी सांगितली. जपानी महिलांचे केस लांबसडक आणि काळेभोर असतात. याबाबत आमच्या ग्रृपमधील एका महिलेने विचारले असता तेथील एका वृद्ध महिलेने उत्तर दिले की, आम्ही कधीही महागडी सौंदर्य प्रसाधने वापरत नाहीत. कोरफड, गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट सौंदर्य प्रसाधने म्हणून वापरतो, असे सांगून ती वृद्ध महिला आपल्या कामात गर्क झाली.
स्ट्रॉबेरी शेतीबद्दल थोडसं…
जपानमध्ये ठिकठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जात असल्याची माहिती आम्हाला तेथील गाईड चिमी यो हिने दिली. स्ट्रॉबेरीची शेती पाहण्याचा आम्ही आग्रह धरल्याने तिने आम्हाला यामामोटो यो नावाच्या गावात नेले. या गावातील इवासा नामक व्यक्ती वयाच्या 80 व्या वर्षी उत्तमरीत्या स्ट्रॉबेरीची शेती करत होती. याचे मला कौतूक वाटले. आपल्या देशात महाबळेश्वर, पुणे तसेच कोकणात पिकणार्‍या स्ट्रॉबेरीपेक्षा त्यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी वेगळी होती. भारत-अमेरिकेत पिकणार्‍या स्ट्रॉबेरीच्या गोडीचे प्रमाण 7 ते 8 ब्रिक इतके असते. भारतात स्ट्रॉबेरीच्या एका झाडाला सुमारे 250 ते 500 ग्रॅमपर्यंत फळे येतात. परंतु, इवासा यांच्या शेतातील स्ट्रॉबेरीच्या एका झाडावर तब्बल 700 ते 1000 ग्रॅमपर्यंत फळे होती. शिवाय या स्ट्रॉबेरीच्या गोडीचे प्रमाण तब्बल 13 ते 14 ब्रिकपर्यंत होते. या गोष्टीला शेतीची सेंद्रिय पद्धत कारणीभूत असल्याचे इवासा यांनी आम्हाला सांगितले. गाईड चिमी यो हिने ओळख करून देताना मी (दत्तात्रय हुच्चे) शेतकरी असल्याचे इवासा यांना सांगितले. तेव्हा त्यांनी खूप आदराने मला नमस्कार करत आपल्या देशातील शेती, शेतीच्या पद्धतीविषयी माहिती विचारली. चर्चेदरम्यान, आपल्या देशातील शेतीत रासायनिक घटकांचा वारेमाप वापर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला सेंद्रिय पद्धतीकडे वळण्याचे आवाहन केले.
जपानी लोक आरोग्यसंपन्न
दौर्‍यावर जाण्यापूर्वी मी जपानी भाषेतील काही शब्द शिकून घेतले होते. याशिवाय संभाषण करताना आवश्यक असलेले काही प्रचलित शब्द मी वहीत लिहून घेतले होते. गरजेवेळी मी ते वाचून वापरात आणत होतो. हा पूर्वाभ्यास मला कामी आला. एक परदेशी व्यक्ती आपली भाषा बोलत असल्याचे पाहून जपानी लोकांना खूप आनंद झाला. तेथील शेतकरी महिलांची भेट घेतल्यावर मला तेथील शेती व्यवस्थापन, क्रॉप पॅटर्न समजला. जपानमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. रासायनिक घटकांचा वापर टाळला जातो. म्हणूनच जपानी लोक आरोग्यसंपन्न असून त्यांचे वयोमान जगातील इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा जास्त आहे. फुले, फळे आणि भात शेती हा जपानी शेतीचा मूळ गाभा आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती होत असल्याने पिकणारा शेतमाल हा उच्च गुणवत्तेचा आणि जीवनसत्वयुक्त असतो. या दौर्‍यात एका गावात आम्हाला 116 वय असलेल्या आजीबाई भेटल्या. त्यांनी आपल्या सुदृढ प्रकृतीचे रहस्य सांगताना नैसर्गिक पद्धतीने होणारी शेती आणि देशाला लाभलेल्या निसर्ग संपदेचा आवर्जुन उल्लेख केला. सेंद्रिय पद्धतीने पिकणारी फळे व भाजीपाला खायला मिळत असल्याने जपानी लोकांचे आरोग्य उत्तम राहते. शिवाय आहारात सेंद्रिय शेतमाल राहत असल्याने जीवनसत्वांची त्यांना कमतरता भासत नाही.
आधी देशहीत, मगच इतर बाबी…
जपान हा देश आपल्या भारत देशाच्या तुलनेत खूपच लहान आहे. तेथील लोकसंख्याही कमी आहे. राष्ट्रनिष्ठेने भारावलेले जपानी लोक अगदी साध्या पद्धतीने परंतु, उत्तमरीत्या आपले आयुष्य जगत आहेत. देश हिताचा ते पदोपदी विचार करतात. आधी देशहीत, मगच इतर बाबींना ते स्थान देत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. निसर्ग संपदेचे जतन करण्यास ते प्राधान्य देतात. निसर्ग संपदेला हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कडक शिक्षा केली जाते. दौर्‍यात आम्ही तेथील स्मिता नदीत बोटीने फिरलो. ही नदी अगदी स्वच्छ होती. नदीतील पाणी मिनरल वॉटरसारखे स्वच्छ व नितळ होते. जपानमध्ये कोणत्याही नदीत कचरा किंवा घाण टाकण्यास बंदी आहे. असे केल्यास तो राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा आहे. आपल्याकडे तर उलट परिस्थिती आहे. केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून नदी स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवते. परंतु, इच्छाशक्ती अभावी हे पैसे पाण्यात जातात. याबाबतीत आपल्याला जपानी लोकांचा आदर्श घेण्याची गरज आहे.

  • मो.नं. 9960634747, 8551858080
    (लेखक सोलापूर येथील प्रगतशील शेतकरी आहेत)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: जपानी लोकजपानी शेतीदेशहीतस्ट्रॉबेरी
Previous Post

जमशेदजी टाटांनी भारतात आणली स्ट्रॉबेरी

Next Post

इस्त्राईली महिला शेतीत अग्रेसर

Next Post
इस्त्राईली महिला शेतीत अग्रेसर

इस्त्राईली महिला शेतीत अग्रेसर

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish