पुसा बासमती तांदळाच्या “जीआय”वरून भारत-पाकिस्तान आमने-सामने आले आहेत. पुसा-1121 वाण चोरून पाकिस्तान नाव बदलून त्याची लागवड व विक्री करत आहे. पाकिस्तान पीके-1121 म्हणजेच पाकिस्तान कायनात नावाने हा बासमती जागतिक पातळीवर विकत आहे. मात्र, भारताकडून होणारे बियाणं तंत्रज्ञान चोरीचे आरोप पाकिस्ताननं फेटाळले आहेत.
पाकिस्ताननं या तांदळासाठी युरोपियन युनियनकडं जीआय टॅगचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारतात पुसा 1121 बासमती वाणाची 2003 मध्येच नोंदणी केली गेली आहे. तर,पाकिस्ताननं 2013 मध्ये ते अधिसूचित केलं होतं. परंतु, नवीन वाणांच्या संरक्षणासाठी तेव्हा भारत आंतरराष्ट्रीय संघाचा सदस्य नव्हता. त्यामुळं राष्ट्रीय स्तरावर भारत या तांदळाचं संरक्षण करू शकतो, परंतु परदेशात काहीही करू शकणार नाही. म्हणूनच बासमती बासमतीवरून भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र होत आहे.
पुसा येथे 2003 मध्ये विकसित केलेल्या पुसा बासमती PB-1121 वाणासह अनेक सुधारित वाणांची पाकिस्तानी बियाणे कंपन्यांनी चोरी केल्याचा आरोप भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (IARI) संचालक ए. के. सिंग यांनी गेल्या महिन्यात केली. याबाबत कायदेशीर कारवाईची मागणीही त्यांनी केली होती.
ए.के. सिंग यांनी पाकिस्तानवर पुसा बासामतीची चोरी करून त्याचे नाव बदलून बियाणे बेकायदेशीरपणे विकल्याचा आणि लागवड केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, पुसा 1509 जातीची पाकिस्तानात किसान बासमती म्हणून विक्री आणि पीक घेतले जात आहे. पाकिस्तान तांदूळ संशोधन संस्थेचे संचालक मुहम्मद इजाज यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. ते म्हणाले की, हा भारताचा निव्वळ खोटा प्रचार आहे. पीके कायनात 1121 आणि किसान बासमती या दोन पाकिस्तानी जातींचा डीएनए भारतीय बियाण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
ॲग्रोवर्ल्ड बुलेटिन 11 एप्रिल । राज्यात 3 दिवस पावसाचे; गारपिटीचा इशारा, रेड अलर्ट!
भारताने नोंदणी केली तरी आव्हान कायम
PK1121 बासमती वाण पाकिस्तानने 2013 मध्ये अधिसूचित केले होते. तर, भारतात पुसा 1121 बासमती जातीची नोंदणी 2003 मध्ये शेतकरी हक्क संरक्षण कायदा 2001 अंतर्गत करण्यात आली. परंतु, नवीन जातींच्या वनस्पतींच्या संरक्षणासाठी (यूपीओव्ही) भारत आंतरराष्ट्रीय संघाचा सदस्य नव्हता. भारत या जातीचे राष्ट्रीय स्तरावर संरक्षण करू शकतो, परंतु परदेशात काहीही करू शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. अशा परिस्थितीत बासमती जातीबाबत भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अधिक गडद होत आहे.