पुणे : राज्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. यंदा देखील कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली होती. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवा तसा दर मिळत नव्हता. आज कापसाच्या भावात वाढ झाली असून 500 ते 800 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
गेल्या वर्षी कापसाला कमी दर मिळाला होता. यंदा देखील कापसाचे दर वाढतील की नाही या अनुषंगाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री केली. मात्र, काही शेतकऱ्यांनी अद्याप देखील कापूस घरातच साठवून ठेवलेला आहे. राज्यातील सध्याच्या स्थितीमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून कापसाच्या भावात चांगल्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव..
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाला आज परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला आहे. येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 8300 ते सर्वसाधारण दर हा 8045 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही वरोरा-खांबाडा या कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. याठिकाणी कापसाची आवक ही 9300 क्विंटल झाली.
मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून कापसाची आवक 5 हजार क्विंटल झाली. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा 8 हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला असून येथे कापसाची आवक 2400 क्विंटल झाली.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस (13/3/2024) |
|||
अमरावती | क्विंटल | 94 | 7300 |
सावनेर | क्विंटल | 3200 | 7325 |
आष्टी (वर्धा) | क्विंटल | 747 | 7400 |
पांढरकवडा | क्विंटल | 199 | 7500 |
मारेगाव | क्विंटल | 922 | 7375 |
पारशिवनी | क्विंटल | 704 | 7250 |
अकोला | क्विंटल | 106 | 7675 |
अकोला (बोरगावमंजू) | क्विंटल | 78 | 7800 |
उमरेड | क्विंटल | 396 | 7600 |
मनवत | क्विंटल | 5000 | 8000 |
देउळगाव राजा | क्विंटल | 2400 | 7800 |
वरोरा | क्विंटल | 883 | 7000 |
वरोरा-खांबाडा | क्विंटल | 9365 | 7000 |
काटोल | क्विंटल | 165 | 7250 |
परभणी | क्विंटल | 1875 | 8045 |
हिंगणघाट | क्विंटल | 8000 | 7000 |
पुलगाव | क्विंटल | 5450 | 7725 |
सिंदी(सेलू) | क्विंटल | 2700 | 7800 |
फुलंब्री | क्विंटल | 172 | 7050 |