मुंबई : Increase in milk price… ऐन सणासुदीच्या तोंडावर दुधाचे दर वाढले आहेत. अमूलनंतर आता गोकुळने देखील म्हशीच्या दूध विक्री दरात वाढ केली आहे. गोकुळने केलेली ही दूध दरवाढ शुक्रवार पासून म्हणजेच उद्या लागू करण्यात येणार आहे.
एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र समूहाकडून मिळालेल्या वृत्तानुसार, गोकुळकडून म्हशीच्या दूध विक्री दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दूध दरवाढ मुंबई आणि पुणे शहराकरता लागू असेल. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात एक लिटर दुधाची किंमत 66 रुपयांवरून 69 रुपये झाली आहे. तर, अर्धा लिटर दुधाची किंमत 33 रुपयांवरून 35 रुपये झाली आहे. यापूर्वी दीड वर्षांत गोकुळने सहा वेळा दूध दरात वाढ केली आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
म्हणून दूध विक्री दरात वाढ करण्यात आली – विश्वास पाटील
याबाबत बोलताना गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले की, “रशिया-युक्रेन संघर्ष आणि अनेक दूध उत्पादक देशात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन घटले असून, दूध पावडरची मागणी वाढली आहे. तसेच दूध संकलन वाढवण्यासाठी खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून दूध विक्री दरात वाढ (Increase in milk price) करण्यात आली आहे,” असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.
म्हैस दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतिलिटर 45 रुपये 50 पैसे होता. तो आता 47 रुपये 50 करण्यात आला आहे. गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ प्रतिलिटर 32 रुपये होता, तो आता 35 रुपये राहील. युक्रेनमधील युद्ध परिस्थितीमुळे दूध पावडरला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोकुळकडे 11 हजार टन दूध पावडरची मागणी आहे. परंतु गोकुळ ही मागणी पूर्ण करू शकत नाही, असे पाटील यांनी सांगितले.
अमूल डेअरीचाही दणका
अमूल दूधने फुल क्रीमसह म्हशीच्या दुधात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे फुल क्रीम दुधाची किंमत लिटरमागे 61 रुपयांवरून 63 रुपये होणार आहे. गायीचे दूध आता 53 रुपये प्रतिलिटरपासून 55 रुपये प्रतिलिटर होणार आहे. यासह गोल्ड, म्हशीच्या दूध दरातही लीटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ गुजरात वगळता देशातील सर्वच राज्यांत लागू असेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇