• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मान्सून पुन्हा सक्रिय; दहा दिवस विलंबाने पोहोचला तेलंगणात; महाराष्ट्रात, इतर राज्यात केव्हा होणार आगमन, ते Monsoon Tracker ने जाणून घ्या…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2023
in हवामान अंदाज
0
Monsoon Tracker
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बिपरजॉय चक्रीवादळामुळे कमजोर पडलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय झाला आहे. दहा दिवस विलंबाने आता मान्सून तेलंगणात पोहोचला आहे महाराष्ट्रात, इतर राज्यात केव्हा होणार आगमन, ते आपण जाणून घेऊया. भारतीय हवामान खात्याचे (IMD) मान्सून ट्रॅकर (Monsoon Tracker) आता नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे सरकत असल्याचे दाखवत आहे. “आयएमडी’ने आता काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तोही पूर्ण अंदाज आपण पाहूया.

भारताच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत हलका आणि काही भागात गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. देशातील अनेक भागात आता विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या अनुमाणानुसार, दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील आणखी काही भाग, ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

IMD हवामान विषयक अंदाज

दिल्लीत पावसाला सुरुवात

आज सकाळी दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस झाला. त्यामुळे दिल्लीकरांना कडाक्याच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने (RWFC) दिल्लीलगतच्या काही भागात हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज, 21 जून रोजी, दिल्ली परिसरात 30-40 किमी प्रति तास वेगाने हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहू शकेल, असे ट्विट RWFC ने केले आहे.

हिमाचल प्रदेशात यलो अलर्ट

हिमाचल प्रदेशातील हवामान खात्याने 21 ते 24 जून दरम्यान बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि पहाडी प्रदेशात काही ठिकाणी हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. 24 जून रोजी हिमाचल प्रदेशात मान्सून तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM

येत्या काही दिवसांचा हवामान अंदाज

ईशान्य आणि पूर्व भारत :

IMD ने 19-21 जून दरम्यान हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

21 आणि 22 जून रोजी बिहार, झारखंडमध्येही एकाकी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 19, 21 आणि 22 जून रोजी पश्चिम बंगाल आणि 21-23 जून दरम्यान ओडिशात पावसाला सुरुवात होईल.

वायव्य आणि लगतचा मध्य भारत :

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

22 आणि 23 जून रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारत :

IMD ने 19-21 जून दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Rise N Shine

23 जूननंतर महाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता

मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने या आठवड्याच्या शेवटी महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या अपेक्षित पुनरुज्जीवनाचा 23 जूननंतर पुण्याच्या आसपासच्या धरण पाणलोट क्षेत्रांना फायदा होण्याची शक्यता असल्याचे वृत्त “टाईम्स ऑफ इंडिया”ने दिले आहे.

IMD पुणेचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी “टाईम्स”ला सांगितले की, “मान्सून 23 जूननंतर पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा आहे. कोकणातील बहुतांश भागांमध्ये आणि पुणे शहरालगतच्या घाट भागात 23 ते 26 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 जून रोजी पुण्याच्या आसपास घाट भागांसाठी अलर्ट दिले जाण्याची शक्यता आहे. पुणे शहर परिसरात त्या कालावधीत फक्त हलका ते मध्यम पाऊस पडेल.”

टोळंबीचे तेल…! ऐकले आहे का..?… पहा हा खास व्हिडीओ
https://youtu.be/fyG9PJEeu1o

उत्तर महाराष्ट्रावर ऑफशोअर ट्रफ तयार होण्याची शक्यता

कश्यपी म्हणाले की, मान्सूनच्या पुनरुज्जीवनामुळे पुणे जिल्ह्यातील शहर आणि घाट भागातील कोरड्या जमिनीचे पुनर्भरण होण्यास मदत होईल. 24 जूनपासून किमान काही दिवस, पुण्याच्या आसपासच्या धरण पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडू शकतो. पश्चिमेकडील वारे आता हळूहळू बळकट होत आहेत आणि उत्तर महाराष्ट्रावर ऑफशोअर ट्रफ तयार होण्याची शक्यता आहे. सह्याद्री पर्वतरांगांवर दाब (प्रेशर ग्रेडियंट)निर्माण होऊन कोकणातदेखील या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

27 जूनपासून धरणाच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ होऊ शकेल. मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो.

Ekavira Pashukhadya

लोणावळा, खंडाळा, ताम्हिणी घाटात इशारा

दक्षिण कोरियातील जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीतील टायफून रिसर्च सेंटरचे हवामान संशोधक विनीत कुमार सिंग यांनी “टाईम्स”ला सांगितले, की पुणे घाटांवर 25-26 जून रोजी सुमारे 40-50 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 27-28 जून रोजी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. लोणावळा, खंडाळा आणि ताम्हिणी येथे 27 आणि 28 जून रोजी 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सततच्या मुसळधार पावसाची शक्यता नसल्यामुळे धरणे लगेच भरू शकत नाहीत. मात्र, काही अंशी पाणी पातळीत वाढ होऊ शकेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • शेतकऱ्यांनी पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, राज्याच्या कृषी विभागाचे पुन्हा आवाहन
  • सोयाबीन उत्पादनात लातूर जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर

Share this:

  • Facebook
  • X
Tags: नैऋत्य मान्सूनभारतीय हवामान विभागमान्सूनमान्सून ट्रॅकर
Previous Post

शेतकऱ्यांनी पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, राज्याच्या कृषी विभागाचे पुन्हा आवाहन

Next Post

Banana Rate Today : केळीला येथे मिळतोय सर्वाधिक दर

Next Post
Banana Rate Today

Banana Rate Today : केळीला येथे मिळतोय सर्वाधिक दर

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.