मुंबई : पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD 23 Aug 2024) वर्तविण्यात आला आहे. तसेच आज राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने काही राज्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून अतिमुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे.
IMD 23 Aug 2024 : या राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट
कोकण आणि गोवा, ओडिसा, उत्तराखंड, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या राज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बंगाल, बिहार, सिक्कीम, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांना हवामान विभागाकडून (IMD 23 Aug 2024) यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर, अकोला, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जालना, ठाणे, नागपूर, नांदेड, परभणी, पालघर, पुणे, बुलढाणा, भंडारा, मुंबई शहर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशीम, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली या जिल्ह्यांना देखील आज यलो अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी हवामान विभागाकडून (IMD 23 Aug 2024) जोरदार ते माध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विटर (X) च्या माध्यमातून जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, जालना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची पर्जन्यमान आकडेवारी दिली आहे.
जळगाव जिल्हातील पर्जन्यमान आकडेवारी (MM 23/8/2024)
मुक्ताईनगर -24
अमळनेर-2
यावल -40.6
पाचोरा -10
भडगांव -24
एरंडोल -6
रावेर -15
चोपडा -29
बोदवड-62
धरणगाव -11
भुसावळ -56.6
जळगाव -30
आरोग्यासाठी नारळ पाणी उत्तम की केळी..??