कापूस पाते व बोंड गळ
कारणे :
1. जास्त किंवा कमी झालेला पाऊस किंवा तापमानामध्ये झालेला चढउतार
2. वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्यांसाठी होणारी पिकाची स्पर्धा
किडींचा प्रादुर्भाव :
1. शेतात पाणी साचून राहणे किंवा जमिनीतील ओलावा कमी होणे
2. सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी होणारी पिकाची स्पर्धा
उपाययोजना :
1. आपत्कालीन परिस्थितीत योग्य अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन करणे.
2. जास्त पाऊस झाल्यास शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे.
3. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे.
4..नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) 29 पी.पी.एम. प्रमाणात फवारणी करणे.
5. वाढ नियंत्रण व शेंडा खुडणी करणे.
6. पोटॅशियम नायट्रेटची 1 टक्के प्रमाणे फवारणी करणे.
7. पिकात हवा व सूर्यप्रकाश मुबलक राहील असे व्यवस्थापन करणे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇
- कृषी सल्ला : मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखावा
- कृषी सल्ला : वेलवर्गीय भाजीपाला फळांवरील फळमाशी कीड नियंत्रण