जैन हिल्स येथे शेतकऱ्यांना नवी दिशा देणारी भविष्यातील शेती म्हणजे फ्युचर फार्मिंगची हाय- टेक शेती उभारलेली आहे. कृषी महोत्सवात अनेक शेतकऱ्यांनी ती पाहिली. आपण इतरही वेळी त्याची माहिती जाणून घेऊ शकतात. भविष्यातील शेतीचे आमच्याकडील तंत्र म्हणजे हायड्रोपोनिक, व्हर्टीकल फार्मिंग तसेच जमीनविरहित (SOILLESS) शेती आपण इथे तयार केलेली आहे. त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून मातीविना शेती
आम्ही पाईपच्या मदतीने अनेक CUPS फीट करून हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून उभे केलेल्या शेती तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मागच्या साईडला मिंट, पालक वगैरे यासारखा भाजीपाला लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये मातीचा वापर न करता आपण शेती तयार केलेली आहे. त्याच्यात आपण कोकोपीट आणि पाण्याचा वापर प्रामुख्याने केलेला आहे. त्याच्यामुळे नेमके काय होणारे आहे, तर भविष्यात जी काही जगाची लोकसंख्या वाढणार आहे; पण जमिनी कमी होत चालल्या आहेत. यावर उपाय म्हणून शेतीचे नवनवे मार्ग अवलंबावे लागणार आहेत. लोकसंख्यावाढीवर सोल्युशन म्हणून आपण भविष्यात वेगळ्या प्रकारची आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करू शकतो.
ट्रेमध्ये भाजीपाला लागवड
हायड्रोफोनिकप्रमाणेच व्हर्टीकल फार्मिंग आणि त्याच्यानंतर जमिनविरहित शेतीचा प्रयोग (SOILLESS SECTIONS) आहे. टिश्यू कल्चरचा डेमो सुध्दा इथे आहे. व्हर्टीकल फार्मिंग स्ट्रक्चरद्वारे आपण ट्रेमध्ये भाजीपाला वगैरेची लागवड केली आहे. त्याच्यामध्ये शेतीसाठी ट्रेचा वापर केलेला आहे. हे सारे भविष्याच्या हिशेबाने आहे, जसे की आपल्याला जमीन कमी होणार आहे; पण लोकसंख्या मात्र भरमसाठ वाढणार आहे. भविष्याच्या दृष्टीने ही शेती उपयुक्त ठरेल. आपण अशी स्ट्रक्चर तयार केली आहेत, जेणेकरून आपला शेतकरी पुढे जाऊन यासारख्या पद्धतीने भाजीपाला लागवड करू शकेल.
पाणी, खते देण्यासाठी ऑटोमेशन सिस्टमचा उपयोग
अशा स्ट्रक्चरमध्ये शेतीसाठी आपण फक्त पाण्याचा वापर करतो. पाणी आणि न्यूट्रियंट ऑटोमेशन सिस्टमद्वारे दिली जातात. आताच्या हिशोबाने शेतीसाठी जमिनी उपलब्ध असतील; पण पुढे भविष्यात पॉप्युलेशन वाढल्यानंतर जमिनी कमी होतील आणि मग शेतकऱ्यांना त्याच्यावर पर्यायी उपाय म्हणून अशा पद्धती वापराव्याच लागतील. यासारखे शेती रेडी केलेली आहे, तर त्याच्यात भाजीपाला उत्पन्न आपण घेऊ शकतो.
स्वप्निल सोनवणे,
सुपरवायझर, फ्युचर फार्मिंग, जैन इरिगेशन सिस्टीम लि, जळगाव