मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
भाग-2 (अंतिम)
मंत्रिमंडळ बैठक : दि. 20 ऑगस्ट २०१९
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे या योजनेस आता व्यापक व सर्वसमावेशक स्वरुप लाभले आहे.
शेती व्यवसाय करताना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व ओढवल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली. दुर्दैवाने अपघात झाल्यास, योजनेच्या निकषानुसार शासनाने नियुक्त केलेली विमा कंपनी 2 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास नुकसान भरपाई देते.
प्रचलित योजनेत शेतकऱ्याचे कुटुंब विमाछत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन, योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वहितीधारक शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील वहितीधारक म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासाठीदेखील लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये वहितीधारक म्हणून नोंद नसलेले कोणतेही 1 सदस्य म्हणून शेतकऱ्याचे आई-वडील, पती अथवा पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यासह कुटुंबातील एक सदस्य अशा 2 जणांना या योजनेतून विमाछत्र लाभणार आहे.
ही योजना विमा कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी लागू राहणार आहे. या कालावधीत खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेला कुटुंबातील कोणताही 1 सदस्य यापैकी कोणालाही केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहणार आहेत. विमा योजनेच्या हप्त्याची संपूर्ण रक्कम शासन विमा कंपनीकडे भरणार आहे. त्यामुळे शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने स्वतंत्ररित्या विमा हप्ता भरण्याची गरज नाही.
शेती व्यवसाय करताना होणरे अपघात, विज पडणे, पूर,सपदंश, विचूदुंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच,अन्य कोणत्याही कारणा मुळे होणारे अपघात, यामळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते.अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” कार्यान्वित केली आहे. सदर योजना अतंर्गत रु.2.00लाख इतक्या विमा संरक्षण देण्यात येते.
लाभार्थ्याचे पाञता निेकष
शेतकरी म्हणून महसूल कागदपञे ७/१२, ६ क, ६ ड (फेरफार) यामध्ये नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी.
विमा संरक्षणासाठी सामाविष्ट असलेले अपघात
रस्ता/रेल्वे अपघात
बुडून मृत्यु
विष बाधा
विजेचा धक्का
विज पडणे
नक्षलवादी हल्ला
उंचावरून पडणे
सर्पदंश
प्राणीदंश
खुन
जनावराचा हल्ला
दंगल
जंतूंनाशके हाताळताना होणारी विष बाधा
इतर अपघात
दावा सादर करण्यासाठी आवश्यक कागदपञे
दावा पञ
६- (फेरफार/ गाव नमुना ६)
वारस नोंद-उतारा ६ क
शव विच्छेदन अहवाल
शेतक-याचा वयाचा पुरावा
पोलिस स्थळ पंचनामा
पोलिस (F.I.R.) किंवा जवाब
अंपगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपञ
बॅंक पासबुक प्रत
लाभारर्थ्याचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापञ
सातबारा उतारा
मृत्यु प्रमाणपञ
तलाठी प्रमाणपञ
पोलिस मरणोत्तर पंचनामा
विम्यापासुन मिळणारे आर्थिक लाभ
अपघाती मृत्यु – रू २,००,०००/-
अपघाता मुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे – रू २,००,०००/-
अपघाता मुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे – रू २,००,०००/-
अपघाता मुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे – रू १,००,०००/-
अर्ज सादर कुठे करावा
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबधित जिल्हा / तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागद पञांसहीत दावा अर्ज दाखल करा.
अधिक माहितीसाठी …www.krishi.maharashtra.gov.in