मुंबई : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर (Good news for farmers) समोर आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळणार आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, या अनुदानाच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
अनुदानासाठी अंमलबजावणी सुरू
अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील याद्या ऑनलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत. आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शासनाने 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत या याद्या बँकेला शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हो सर्व प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर लवकरच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल.
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणारं तीन टप्प्यांत
• शेतकऱ्यांची पहिली यादी- 8.29 लाख
अनुदानची रक्कम – 4,000 कोटी
• शेतकऱ्यांची दुसरी यादी- 10 लाख
अनुदानाची रक्कम- 5,000 कोटी
• शेतकऱ्यांची तिसरी यादी- 4.85 लाख
अनुदानाची रक्कम- 1,200 कोटी
कशी पाहायची ऑनलाईन लाभार्थी यादी?
CSC च्या पोर्टलवर त्याच शेतकऱ्यांना याद्या पाहता येतील. ज्या शेतकऱ्यांचे CSC पोर्टलवर अधिकृतता (Authorization) असेल.
आपणास CSC पोर्टलवर कर्ज सर्च करावं लागेल.
आपणास महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लिंक दिली जाईल. यावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्ही त्या पोर्टलवर जाल. त्यावर आपणास लिस्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे.
यानंतर आपणास तेथे जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल.
तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गावांची नावे दिसतील.
आपण ज्या गावातील असाल त्या गावाची लाभार्थी यादी पाहू शकता.
A पासून Z पर्यंत तालुक्यांची नावे दिली जातील.
आपणास केवायसी साठी सूचना करण्यात येतील.
जर यावर तुमची माहिती चुकीची असल्यास बँकेत आक्षेप नोंदवावा.
कशी पाहाल तुमची पात्रता?
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करून देखील तुमची कागदपत्रे आणि पात्रता पडताळू शकता. तसेच तुम्ही सीएससीच्या पोर्टलवर जाऊन तुमची पात्रता तसेच बँक खाते याबाबत माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल. यावर तुम्ही विचारलेली माहिती भरून तुमची पात्रता कागदपत्रे तपासू शकता.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇