मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी 24 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली होती. त्यात आज, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी बदलली आहे. यात गिरीश महाजन यांच्याकडील धुळे, लातूर व नांदेड या तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडील जळगाव कायम ठेवून बुलढाणा मात्र दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.
नाशिक, सातारा व रायगडचा पालकमंत्री पदाबाबत पेच कायम आहे. त्यामुळे त्याबाबत आग्रही असलेले छगन भुजबळ व आदिती तटकरे हे अजूनही प्रतीक्षेत आहेत.
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. त्यांच्याकडील वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गोंदिया हे 5 जिल्हे काढून नवीन मंत्र्यांकडे सोपविण्यात आले आहेत.
पालकमंत्र्यांची नवी यादी पुढीलप्रमाणे:
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, अकोला (सोलापूरऐवजी नवीन जिल्हा)
चंद्रकांत पाटील – सोलापूर, अमरावती (नवीन जिल्हे)
पुणे – अजित पवार (नवे पालक मंत्री)
विजयकुमार गावित – नंदुरबार ( नवीन यादीनुसार भंडारा हा अतिरिक्त कार्यभार)
गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड (पूर्वीचेच कायम )
गुलाबराव पाटील – जळगाव (बुलढाणा पालकमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटील यांना पदभार)
दादा भुसे – नाशिक
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम (कायम)
सुरेश खाडे – सांगली
संदिपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड (कायम)
तानाजी सावंत – धाराशिव
परभणी – संजय बनसोडे (नवे पालकमंत्री)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार – हिंगोली
दीपक केसरकर – मुंबई शहर (कोल्हापूरसाठी नवीन पालकमंत्री हसन मुश्रीफ)
अतुल सावे – जालना (बीड नवे पालकमंत्री धनंजय मुंडे )
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे (कायम l)
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
आज नव्याने नियुक्त पालकमंत्री
पुणे – अजित पवार
अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर – चंद्रकांत पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
बीड – धनंजय मुंडे
परभणी – संजय बनसोडे
नंदुबार – अनिल भाईदास पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार (जुने जिल्हे – चंद्रपूर, गोंदिया )
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇