Genetically modified (GM)… माहिती कृषी अभ्यासक आणि शेतकरी नेते अनिल घनवट आणि डॉ. अजित नवले यांनी जीएम म्हणजे नेमकं काय? त्याला मान्यता कशी मिळते? याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. जीएम वाणांनी परवानगी मिळणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचे असल्याचेही अनिल घनवट यांनी सांगितले आहे.
मोहरीच्या जीएम (Genetically modified) वाणाला देशातील बायोटेक रेग्युलेटर जेनेटिक इंजिनीअरिंग मूल्यांकन समितीनं (GEAC) मान्यता दिली आहे. दिल्ली विद्यापीठाने हे वाण विकसित केलं आहे. दरम्यान, जीएम म्हणजे नेमकं काय? त्याला मान्यता कशी मिळते? याबाबतची माहिती कृषी अभ्यासक आणि शेतकरी नेते अनिल घनवट आणि डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. जीएम वाणांचा वापर करण्यास परवानगी देणं फायद्याचे असल्याचे मत यावेळी दोघांनीही व्यक्त केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात?
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
जीएम म्हणजे नेमकं काय?
वेगवेगळ्या पिकांच्या जीन्समध्ये फेरफार करुन चांगले गुणधर्म असलेली बियाणे तयार करणे म्हणजे जीएम होय. पिकांच्या जनुकामध्ये सुधारणा करुन विशिष्ट दर्जाची बियाणं तयार केली जातात, यालाच जीएम असं म्हटलं जात, असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
अजित नवले काय म्हणाले?
जीएम वाणाची माहिती (Genetically modified information) सांगताना अजित नवले यांनी उदाहरण देखील दिलं. समजा, एखादा गहू कमी पाण्यात येतो, त्याचा कमी पाण्यात येण्याचं एक सुत्र घेतलं. दुसरा गहू म्हणजे जो विशीष्ट प्रकारच्या अळीला प्रतिकार करतो. त्या गव्हामधून अळीला प्रतिकार करणारं सुत्र घेतलं. या दोन्ही गव्हामधून चांगलं वाण विकसीत करणं म्हणजेच जीएम असल्याचे नवले यावेळी म्हणाले.
आक्षेप काय?, जीएम वाणांना मान्यता देताना काय दक्षता घेतली जाते?
प्राण्यांचे जीन्स वनस्पीतीमध्ये टाकण्याचे संशोधन काही ठिकाणी सुरु झालं. ते जीन्स वनस्पतीमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्याला काही पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतले. कारण त्या जीएम मध्ये प्राण्यांचे जीन्स टाकल्यामुळं त्याचा मानवी आरोग्याला, पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो असं पर्यावरण वाद्यांचं मत आहे. यामुळं कॅन्सरसारखे आजार देखील होऊ शकतात असाही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळं प्राण्यांचे जीन्स वनस्पतीत विरतीत करण्यास विरोध होत आहे.
कृषी अभ्यासक आणि शेतकरी नेते अनिल घनवट यांनी देखील जीएम बाबत त्यांची भूमिका मांडली. जीएम वाण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचे घनवट यावेळी म्हणाले. पिकांच्या जनुकामध्ये सुधारणा करुन विशिष्ट दर्जाची बियाणं तयार करणं म्हणजे जीएम होय. जीएम बियाणांना मान्यता देताना याचा मानवाला आणि प्राण्यांना कोणताही धोका होणार नाही याची दक्षता घेतली जाते.
जीएम वाण कसं ठरवलं जात?
जीएम वाण ठरवताना ते प्राण्यांसाठी योग्य आहे का? हे बघितलं जातं. तसेच त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, याचाही विचार केला जातो. त्याचबरोबर हे मानवी शरीराला घातक नाही याचाही विचार केला जातो. त्याच्या सर्व चाचण्या करुन परवानगी दिली जात असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली. यावरुन जीएम वाणांना मान्यता द्यायची की नाही हे ठरवलं जात, असेही त्यांनी सांगितलं.
जीएम वाणांनी परवानगी मिळणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचे आहे. कारण विशिष्ट फवारणी केल्यावर पिकांवर कोणताही धोका होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना भीती बाळगण्याचं काही कारण नाही. दुसरा मुद्दा म्हणजे मजुरांचा प्रश्न आहे. तो देखील यामुळं सोडवण्यास मदत होईल. उत्पादन खर्च कमी येईल. फवारणी करुन पीक चांगलं येईल अशी माहिती घनवट यांनी दिली. पिकावर पडणारे रोग आणि कीड नियंत्रण करणं देखील यामुळं शक्य होते. मोहरी कापसाबरोबरच हरभरा, सोयाबीन, मका, पपई, सफरचंद या पिकांच्या जीए वाणांना देखील परवानगी मिळावी, असे घनवट म्हणाले.
आत्तापर्यंत फक्त या वाणालाच सरकारची परवानगी
जरी मोहरी आणि HTBT कापसाच्या वाणाला बायोटेक रेग्युलेटर जेनेटिक इंजिनीअरिंग मूल्यांकन समितीनं (GEAC) मान्यता दिली असली तरी सरकारनं अद्याप परवानगी दिली नाही. सरकारनं फक्त BT कापूस एक आणि BT कापूस दोन या वाणांनाचं परवानगी दिली असल्याची माहिती देखील घनवट यांनी दिली. मोहरी आणि HTBT कापसाच्या वाणाला फक्त मान्यता मिळाली आहे, परवानगी मिळणं अद्याप बाकी आहे.
जनुकीय सुधारित पिके कधीपासून सुरू झाली
जीएम पिके प्रथम 1994 मध्ये ‘यूएसएम’ध्ये (United States of America) फ्लेवर सवर टोमॅटोसह आणली गेली. ज्याची पिकण्याची प्रक्रिया मंद करण्यासाठी अनुवांशिकरित्या सुधारित केले गेले. ते मऊ होण्यास आणि सडण्यास उशीर झाला. सन 1990 च्या दशकाच्या मध्यापासून जीएम पिकांची (मका, सोयाबीन, कापूस, कॅनोला, साखरबीट, अल्फल्फा, पपई, स्क्वॅश, बटाटा, वांगी) शेती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
व्यावसायिक जीएम पिके (Genetically modified crop)
Bt: Bacillus Thuringiensis (बॅसिलस थुरिंगिएन्सिस) या जिवाणूतील विषाचा वापर करून कीटक प्रतिरोधक.
A Ht :- Herbicide Tolarent (हरबीसाईट टोलरेंट) खालीलपैकी किमान एका तणनाशकाला सहनशील. * ग्लायफोसेट-Glyphosate ( राउंडअप – Roundup)
किंवा
* ग्लुफोसिनेट-Glufosinate,
* अमोनियम – Ammonium (लिबर्टी-Liberty).
Ht-Bt:- Herbicide Tolarent-Bacillus
Thuringiensis (हरबीसाईट टोलरेंट-बॅसिलस थुरिंगिएन्सिस) बीटी कीटक प्रतिरोधकता आणि तणनाशक सहिष्णुता या दोघांचे स्टॅक (Stack) केलेले गुणधर्म असलेली पिके.
VR :- Virus Resistant विषाणू प्रतिरोधक.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇