जळगाव : गहू पिकावर (gahu pik) तांबेरा व करपा रोग हे दोन्ही बुरशीजन्य रोग मुख्य समस्या बनू शकतात. तांबेरा रोगामुळे पिकाची वाढ मंदावते, तर करपा रोगामुळे गहूच्या पिठाची गुणवत्ता कमी होते. हे रोग जास्त ओलसर वातावरणात पसरतात आणि फळांच्या गाठींवर व पानांवर डाग आणि जखमा निर्माण करतात. या रोगांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेळोवेळी योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे. रासायनिक औषधे, पिकांची योग्य फांदणी आणि स्वच्छता राखणे हे तांबेरा व करपा रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहेत.
तांबेरा रोग
गहू पिकावर (gahu pik) पिवळा तांबेरा, तपकिरी तांबेरा व काळा तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. यापैकी काळा व नारंगी तांबेरा या दोन्ही महत्वाच्या रोगांमुळे ९० टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
उपाय
तांबेरा रोग प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी.
तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या तांबेरा प्रतिबंधक वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी.
पिकास जरुरी पुरतेच व बेताचे पाणी द्यावे.
तांबेरा दिसू लागतात मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ७५ टक्के डब्लू.पी.३० ग्रॅम १०लिटर पाण्यातून फवारावे. जरूरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.
करपा रोग
गव्हावर करपा रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो.
उपाय
करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाची लक्षणे दिसू लागताच कॉपर ऑक्सिक्लोसराईड + मॅन्कोझेब या बुरशीनाशकाच्या प्रत्येकी २० ग्रॅम १० लिटर पाण्यातून दोन फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात.