हॅपनिंग

Wow! मंत्रिमंडळ खातेवाटप 2022; कृषीमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : अखेर रविवारी शिंदे सरकार अर्थात राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप 2022 जाहीर झाले. त्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील ही महत्त्वाची कृषी खाती वाटप झाली. नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

शिंदे फडणवीस सरकार राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
शिंदे, फडणवीस यांच्याकडील खाती

मंत्रिमंडळ खातेवाटप 2022 जाहीर : अतुल सावे सहकारमंत्री

कृषीशी संबंधित इतर महत्त्वाच्या खात्यात मृद जलसंधारण खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. जलसंपदा खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. अतुल सावे यांच्याकडे महत्त्वाचे सहकार खाते देण्यात आले आहे.

भाजप, शिंदे गट समसमान 10-10 मंत्र्यांची संख्या

आता मंत्रिमंडळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 20 मंत्री झाले आहेत. रविवारी 18 नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले गेले. त्यात भाजपचे 9 व शिंदे गटाचे 9 मंत्री आहेत. तर 20 जणांच्या मंत्रिमंडळात शिंदे व फडणवीस यांच्यासह भाजप व शिंदे गट यांच्या मंत्र्यांची एकूण संख्या 10-10 अशी समसमान आहे.

नगरविकास मुख्यमंत्र्यांकडे, तर गृह व अर्थ उपमुख्यमंत्र्यांकडे

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

आझादी का अमृतमहोत्सव : “ॲग्रोवर्ल्ड”च्या वाचकांसाठी खास सवलतीत हेल्थ फिटनेस, आरोग्य व इम्युनिटी वाढविणारे दर्जेदार प्रॉडक्टस! 

(👆🏻 वरील लाल अक्षरांवर क्लिक करून जाणून घ्या)

शिंदे फडणवीस सरकार राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर नवे मंत्री
राज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांकडील खाती

खातेवाटप 2022 : नव्या मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे –

  1. राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  2. सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  3. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  4. डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  5. गिरीष महाजन  – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  6. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
  7. दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
  8. संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
  9. सुरेश खाडे – कामगार
  10. संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  11. उदय सामंत – उद्योग
  12. प्रा.तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  13. रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  14. अब्दुल सत्तार – कृषी
  15. दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
  16. अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  17. शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
  18. मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

    सहकारमंत्री अतुल सावे
    सहकारमंत्री अतुल सावे
    राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

आपणास हेही वाचायला आवडेल 👇🏻👇🏻

लॉकडाऊनमध्ये गावी परतलेल्या अभियंता जोडप्याने तयार केला मजूर समस्येवर मात करणारा स्वस्तातील इलेक्ट्रिक बैल 

Related Articles

Back to top button