• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

तुषार सिंचनचा लाभ घेतलेले शेतकरी तीन वर्षांनंतर ठिबकसाठी पात्र

केंद्राकडून अनुदान धोरणात मोठे बदल; ऑटोमेशनला आणले अनुदानाच्या कक्षेत

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 24, 2023
in हॅपनिंग
0
तुषार सिंचन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या अनुदान वाटप धोरणात महत्त्वाचे बदल केले आहे. तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता तीन वर्षांनी पुन्हा ठिबक संचाचा लाभ घेता येणार आहे.

तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला आता सात ऐवजी तीन वर्षात पुन्हा ठिबक सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच ऑटोमेशनला देखील अनुदानाच्या कक्षेत आणले गेले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) या उपक्रमासाठी अनुदान मिळते. या योजनेतील किचकट बाबी हटवून काही बदल करण्याचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठविला गेला होता. त्यानुसार केंद्र शासनाने सन 2023 मधील नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले आहेत. सध्याच्या नियमानुसार सूक्ष्म संचासाठी सात वर्षात पुन्हा अनुदानाचा लाभ घेता येत नाही.

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

एखाद्या शेतात तुषार संचासाठी अनुदान घेतलेल्या शेतकऱ्याला आता तीन वर्षानंतर ठिबक संच घेण्याकरिता अनुदान देता येणार आहे. परंतु ठिबक अनुदानाची परिगणना करताना आधीच्या तुषार संचासाठी दिलेल्या अनुदांनाची रक्कम ठिबकच्या अनुदानातून वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे.  या बदलामुळे शेतकऱ्याला एकाच क्षेत्रावर पिक पद्धतीत बदल करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे ठिबकखालील क्षेत्रात वाढ होणार असून खते व पाण्याची बचत होण्यास मदत मिळेल, असे फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे. या अनुषंगाने आवश्यक ते बदल महाडीबीटीवर करण्यात येत आहेत.

सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात राज्य आघाडीवर – डॉ. कैलास मोते

फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सांगितले की, “ सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात राज्य आघाडीवर आहे. मात्र, या योजनेत बदल करण्यासाठी 2022 मध्ये केंद्राला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील बदल स्वीकारण्यात आले आहेत. ठिबक आधारित स्वयंचलित प्रणालीसाठी (ऑटोमेशन) आता प्रतीहेक्टरी रु. 40 हजार निधी मर्यादा केंद्र शासनाने निश्चित करून दिलेली आहे.यामुळे राज्यातील ऑटोमेशन आधारीत उच्च तंत्रज्ञान कृषी व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.” ऑटोमेशन कार्यक्रम राज्यात राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे.

 

 

सूक्ष्म सिंचन योजनेतील हे आहेत महत्वाचे बदल

• तुषार सिंचनासाठी लाभ घेतलेल्या त्याच शेतकऱ्याला तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ मिळणार.
• ऑटोमेशनसाठी प्रतिहेक्टरी 40 हजार रुपये निधी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
• समूह शेतीमधील गटांना सूक्ष्म सिंचनासाठी 55 टक्क्यांपर्यत अनुदान
• तुषार सिंचनामध्ये राईजर पाईप हा घटक GI लोखंडी सह POLYPROPILIN (PPP) आणि PVC राईजर पाईप वापरण्यास मान्यता. SPRINKLER नोझल IS12232 या घटकासाठी ब्रास आणि प्लास्टिक नोझल वापर करण्यास मान्यता. MINI SPRINKLER घटकामध्ये मेन व सबमेन साठी PVC पाईपसह HDPE IS 4984 पाईप वापरास मान्यता.

 

Aanand Agro Care

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • सावधान, महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे; गुजरात, मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाची शक्यता
  • 4 महिन्यांत 32 लाखांची कमाई; पपई आणि टरबूज विकून बदलले शेतकऱ्याचे नशीब

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: केंद्र शासनतुषार सिंचनशेतकरी
Previous Post

सावधान, महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे; गुजरात, मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाची शक्यता

Next Post

‘मिधिली’च्या तडाख्यानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ!

Next Post
मिधिली

'मिधिली'च्या तडाख्यानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ!

ताज्या बातम्या

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.