पुणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने अॅग्रीस्टॅक या डिजीटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक अंतर्गत डिजीटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे.
कागदपत्रे
आधारकार्ड, सर्व 7/12 किंवा नमुना 8 अ,
आधारकार्ड सलग्न असलेला मोबाईल (ओटिपी करिता)
Farmer ID : फार्मर आयडी का बनवावी ?
ज्याप्रमाणे सर्व सामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधारकार्ड आहे. त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे फार्मर आयडी राहणार आहे. त्यामुळे 7/12 शी संबधीत सर्व लाभाकरिता फार्मर आयडी अत्यावश्यक होणार आहे.
फार्मर आयडी न बनविल्यास
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ बंद होईल.
नमो शेतकरी अंतर्गत लाभ मिळणार नाही.
पीक विम्याचाही लाभ घेता येणार नाही.
पीक कर्ज मिळनार नाही.
धान खरेदी तथा बोनस थांबून जाईल.
कृषीविषयक सर्व योजनाकरिता आवश्यक
नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान मिळणार नाही.
जमीन खरेदी विक्री करता येणार नाही.
कर्ज माफी लाभ घेता येणार नाही. इ.
अशाप्रकारे अनेक लाभाकरिता फार्मर आयडी मागविला जाईल. तेव्हा शेतक-यांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आजच फार्मर आयडी बनवून घ्या.
योजनेची संपूर्ण माहिती आणि शेवटची मुदत
ही आहे शेवटची मुदत
अॅग्रीस्टॅक Agristack प्रकल्पांतर्गत फार्मर आयडी काढण्यासाठी शेवटची मुदत ही दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक लवकरात लवकर (Farmer ID) तयार करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
(अनेकदा शासकीय योजना सुधारित केल्या जातात, अनुदान नियम व टक्केवारीतही बदल होतात. त्यामुळे, ताज्या व अपडेटेड अधिक माहिती साठी तसेच मार्गदर्शक सुचनासाठी नजीकच्या महाराष्ट्र शासन कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.)